Mumbai Traffic Change Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Traffic Change : PM नरेंद्र मोदींची मुंबईत सभा, वाहतुकीत मोठे बदल; कुठं रस्ता बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Mumbai Traffic Change update : पंतप्रधान मोदी यांची मुंबईतील दादरमध्ये सभा आयोजित केली आहे. त्यानंतर मुंबईच्या दादरमध्ये वाहतुकीत मोठे बदल करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या दादरच्या शिवाजी पार्कात सभा होणार आहे. या सभेसाठी ट्रॅफिक पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. भाजपने दादरच्या शिवाजी पार्कात उद्या म्हणजे १४ नोव्हेंबर रोजी महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा आयोजित केल्याने वाहनधारकांसाठी परिसरातील अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. तर वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांना पर्यायी मार्ग देखील दिले आहेत.

वेस्टर्न आणि इस्टर्न हायवेवरून अनेक वाहन सभेच्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. या सभेमुळे मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत दादर आणि जवळपास परिसरातील १४ मार्गावरून होणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. यासाठी वाहतूकधारांना पर्यायी मार्ग देखील उपलब्ध करून दिले आहेत.

कोणत्या मार्गावरून असणार वाहतूक बंद?

एस व्ही एस रोड , डॉ. बाबासाहेब आंबेडकर वरळीकर चौक (सेंच्युरी जंक्शन) ते हरिओम जंक्शनपर्यंत

केळूस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर, शिवाजी पार्क, दादर.

एमबी राऊत मार्ग, शिवाजी पार्क दादर

पांडुरंग नाईक मार्ग(रोड क्रमांक ५) शिवाजी पार्क, दादर

दादासाहेब रेगे मार्ग, शिवाजी पार्क दादर

लेप्टिनेंट दिलीप गुप्ते मार्ग, शिवाजी पार्क गेट नंबर - ४ शीतलादेवी रोड, शिवाजी पार्क

एलजे रोड : गडकरी जंक्शन, दादरहून शोभा हॉटेल, माहीमपर्यंत

एनसी केळकर रोड : हनुमान मंदिर जंक्शन ते गडकरी जंक्शन, शिवाजी पार्क, दादर

टीएच कटारिया रोड, गंगा विहार जंक्शन ते असावरी जंक्शन, माहीम पर्यंत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माहेश्वरी सर्कल ते कोहिनूर जंक्शन ,दादर

टिळक रोड , कोतवाल गार्डन सर्कल,दादर (पश्चिम) ते आरए किदवई रोड, माटुंगा (पूर्व)

खान अब्दुल गफ्फार खान रोड, सी लिंक रोड ते जेके कपूर चौकाहून माधव ठाकरे चौकापर्यंत

थडानी रोड, पोद्दार रुग्णालय जंक्शन ते बिंदु माधव ठाकरे चौकापर्यंत

डॉ. एनी बेसेंट रोड , पोद्दार रुग्णालय जंक्शन ते डॉ. नारायण जंक्शनपर्यंत

पर्यायी मार्ग काय?

एसव्हीएस रोडहून उत्तर दिशेकडे जाणाऱ्या लोकांना सिद्धिविनायक जंक्शनहून एसके भोळे रोड-आगार बाजार, पुर्तगाल चर्च,डावा वळण्यावर गोखले, एसके भोळे रोडचा पर्यायी मार्ग उपलब्ध असणार आहे.

एसव्हीएस रोडहून दक्षिण दिशेकडे जाणाऱ्या दांडेकर चौकाहून डाव्या बाजूने पांडुरंग नाईक मार्ग, राजा बडे चौक, उजव्या वळणावरून एलजे रोडहून गोखले रोड किंवा एनसी केळकर रोडहून जाता येऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT