Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg saam tv
मुंबई/पुणे

Samruddhi Mahamarg : मुंबई-नागपूर आता फक्त ८ तासांत, समृद्धी महामार्गाचे काम १०० टक्के पूर्ण

Mumbai–Nagpur Expressway : समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूरचा प्रवास फक्त 8 तासांत होईल. 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

Namdeo Kumbhar

Samruddhi Mahamarg, Mumbai-Nagpur Expressway : नागपूर ते मुंबई ७०१ किलोमीटर लांबीचा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासात मैलाचा दगड ठरेल. सध्या नागपूरपासून इगतपुरीपर्यंतचा (625 किलोमीटर) हा महामार्ग (Maharashtra Samruddhi Mahamarg) सुरू आहे. तर इगतपुरी ते मुंबई दरम्यानचा 76 किलोमीटरचं काम अंतिम टप्प्यात आहे. या टप्प्याचे उद्घाटन फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. महामार्गाच्या पूर्णत्वामुळे मुंबई ते नागपूर हे 16 तासांचे अंतर आता फक्त 8 तासांत पार करता येणार आहे. हा महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. हा महामार्ग महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी एक निर्णायक पाऊल ठरणार आहे.

फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टमधील महत्त्वाचा भाग -

नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्गाच्या यशस्वी उभारणीसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका अत्यंत कौशल्यपूर्ण सिव्हिल इंजिनियरची निवड केली. डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांनी समृद्धी महामार्ग उभारणीत मोलाची भूमिका बजावली. त्यांना "सर्वोत्कृष्ट अभियंता पुरस्कार" आणि "राष्ट्रीय गौरव पुरस्कार" प्रदान करण्यात आले आहे. डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड, महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MSRDC) चे व्यवस्थापकीय संचालक, यांच्यावर या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवामुळे आणि कुशल व्यवस्थापनामुळे या प्रकल्पाची कामगिरी यशस्वी ठरली आहे. महामार्गाच्या बांधकामातील त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना MSRDC चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपद देण्यात आलेय.

समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये

मुंबई ते नागपूर हा महामार्ग देशातील सर्वात आधुनिक 6-लेनचा एक्सप्रेसवे आहे. याची रुंदी 120 मीटर असून तो 701 किलोमीटर लांब आहे. या महामार्गावर 150 किमी प्रतितास या वेगाने प्रवास करण्याची सुविधा आहे. महामार्गावर 65 फ्लायओव्हर, 24 इंटरचेंज आणि 6 बोगदे बांधले आहेत. यातील इगतपुरी ते मुंबई दरम्यानचा 8 किलोमीटर लांबीचा बोगदा अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित आहे. हा बोगदा फुल वॉटर मिस्ट सिस्टीमने सुसज्ज आहे.

पर्यावरणीय आणि सामाजिक विकासासाठी योगदान

समृद्धी महामार्गाच्या बांधकामात वन्यजीवांची सुरक्षितता जपण्यासाठी 80 हून अधिक संरचना उभारण्यात आल्या आहेत. या महामार्गाजवळ 18 स्मार्ट टाऊनशिप विकसित केल्या जाणार आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या 10 जिल्ह्यांना थेट आणि 14 जिल्ह्यांना अप्रत्यक्षपणे जोडणार आहे, ज्यामुळे राज्याच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीला मोठा हातभार लागेल. 67,000 कोटी रुपये खर्च करून उभारलेला हा महामार्ग उद्योग, व्यापार आणि प्रवासात क्रांतिकारी बदल घडवेल.

महामार्गाच्या यशस्वितेची ओळख

महामार्गाच्या उभारणीमुळे वेळ आणि इंधनाची बचत होईल. औद्योगिक मालवाहतुकीचा खर्च कमी होईल. मागील दोन वर्षांत या महामार्गावर 1.52 कोटी वाहनांनी प्रवास केला आहे. 1,100 कोटी रुपये टोलच्या माध्यमातून उत्पन्न मिळाले आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील हा महामार्ग प्रकल्प महाराष्ट्राच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुढच्या पिढीला माहिती होण्यासाठी कारगिल दिन साजरा केला पाहिजे

Garlic Oil : हाडे आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी लसूण तेल ठरते फायदेशीर

बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 10 ते 12 जण जखमी; महामार्गावरील घटनेनं खळबळ|VIDEO

Pune Traffic : वाघोलीतील वाहतूक कोंडीची कटकट कायमची संपणार, पोलिसांनी आखला प्लॅन, उपाय योजनाही सुरू

Fermented Rice Water: शिळे तांदळाचे पाणी प्यायल्यास शरीरावर कसे परिणाम होतात?

SCROLL FOR NEXT