Sanjay Raut on Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: 'पिंक सरडा बारामती सोडणार', शरद पवारांसमोरच राऊतांचा अजितदादांवर घणाघात

Sanjay Raut on Ajit Pawar: राज्यात रंगांचं राजकारण सुरु झालंय....एकीकडे अजित पवार पिंक पॉलिटीक्स करत असतानाच ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी अजित पवारांच्या नरेटीव्हलाच सुरुंग लावलाय, शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत संजय राऊत अजित पवारांना असं काय बोलले, जाणून घेऊ...

Tanmay Tillu

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीच्या पदाधाकिऱ्यांचा संयुक्त मेळावा पार पडला. या मेळाव्यात सर्वाधिक लक्षवेधी भाषण ठरलं ते ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं. कारण संजय राऊतांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासमोरच अजितदादांवर जोरदार टीकेची झोड उठवलीय.

अजितदादांच्या पिंक पॉलिटिक्सची खिल्ली उडवत संजय राऊतांनी थेट अजितदादांचा रंग बदलणारा सरडा असा उल्लेख केला आणि सभागृहात हशा पिकला. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी अजित पवार यांना टोला लगावत म्हटलं की, लाडक्या भावानं रंग बदलला.

राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी महाराष्ट्रातील रंगाच्या राजकारणाचं सार सांगितलं. गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नाही, असं म्हणत राऊतांनी अजित पवारांच्या पिंक पॉलिटीक्स नरेटीव्हलाच सुरुंग लावलाय. महाराष्ट्रात केवळ भगवा आणि तिरंगाच चालतो असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नाही.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंक रंगाचं जॅकेट घालायला सुरुवात केलीये. हा रंग शुभ असल्याचं अजितदादांना सांगितलं गेलंय. त्यामुळेच त्यांनी या रंगाचे जॅकेट रोज घालायला सुरुवात केल्याचं सांगितलं जातं. एवढंच नाही तर अजित पवार जिथं सभा घेतात तिथे गुलाबी मंडप आणि महिलाही गुलाबी फेटे घालून येतात. त्यावरच राऊतांनी प्रहार केल्यानं आता राज्यात रंगांचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT