student End Life over board exam results Saam TV
मुंबई/पुणे

10th Result : दहावीत मित्रांपेक्षा कमी गुण मिळाले, मुलाने आयुष्य संपवले, पिंपरीत खळबळ

student End Life over board exam results : पिंपरी चिंचवडमधील १६ वर्षीय मुलाने दहावीत ७५ टक्के गुण मिळाल्यानंतर आत्महत्या केली. मित्रांपेक्षा कमी गुण मिळाल्याने तो नैराश्यात गेला होता. ही घटना शिक्षणाच्या ताणाखाली दबलेल्या विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर प्रश्न उपस्थित करते.

Namdeo Kumbhar

गोपाल मोटघरे, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

10th class result pressure, Pimpri Chinchwad student End Life : आपल्यापेक्षा जास्त मित्राला गुण मिळाले, मी अभ्यास करूनही दहावी बोर्डाच्या परीक्षेत फक्त ७५ टक्के गुण कसे मिळाले, असे म्हणत पिंपरी चिंचवडमध्ये १६ वर्षांच्या मुलाने टोकाचे पाऊल उचलले. दहावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नाहीत, त्यामुळे मुलगा नैराश्यात गेला होता. त्यामधूनच अल्पवयीन विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. पिपंरी चिंचवडमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकर वाडी परिसरातील शिवने कॉलोनी या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली. उमंग रमेश लोंढे वय १६ वर्ष असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याच नाव आहे. उमंग लोंढे याला दहावीच्या परीक्षेत ७५ टक्के गुण प्राप्त झाले होते. त्याच्या मित्रांना त्याच्यापेक्षा जास्त टक्के प्राप्त झाले होते. त्यामुळे तो निकाल लागल्या पासून नैराश्यात होता. काल सकाळी त्याचे आई वडिल घराबाहेर गेल्यानंतर त्याने आपल्या राहत्य घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणात चिंचवड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

चिंचवड येथील वालेकर वाडी परिसरातील शिवले हाऊसिंग सोसायटीत समीर रमेश लोंढे याने घरी सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी घडली असून, आज सकाळी 11:30 वाजता वाय.सी.एम. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आले. समीर याला बेशुद्ध अवस्थेत त्याच्या वडिलांनी प्रथम अक्षय केअर हॉस्पिटल, वाल्हेकर वाडी येथे दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी वाय.सी.एम. रुग्णालय, पिंपरी येथे हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

समीरचे वडील, रमेश उत्तम लोंढे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, समीरने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ७५ टक्के गुण मिळवले होते. परंतु, त्याच्या मित्रांना त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळाल्याने तो निकालानंतरपासून गप्प आणि उदास झाला होता. याच नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

SCROLL FOR NEXT