Yellow Alert : महाराष्ट्रात अवकाळीचा धुमाकूळ, ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Heavy Rain Alert Maharashtra : महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा. रायगड, मराठवाडा, कोकणात यलो अलर्ट; नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असा हवामान विभागाचा सल्ला.
weather
weathersaam tv
Published On

Today Maharashtra weather forecast : महाराष्ट्रात मागील २४ तासांत मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. मराठवाड्यात ६० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहिल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. आज सकाळी मुंबई आणि उपनगरांत हलक्या पावसाने हजेरी लावली, तर ठाण्यात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना आजपासून पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

weather
Pune : भयावह! भरचौकात १८ वर्षाच्या तरूणीची हत्या, दुचाकीवर आले अन् सपासप वार केले

मुंबईकरांनो छत्री घेऊनच घराबाहेर पडा -

हवामान विभागाने ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. शेतकरी आणि नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आणि छत्री बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत आज कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील, तर वाऱ्यांचा वेग ३० किमी प्रतितास असेल. नवी मुंबईत आंशिक ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. पालघरमध्येही यलो अलर्ट लागू असून, कमाल तापमान ३३ अंश आणि किमान २६अंश सेल्सिअस राहील.

weather
TikTok लाईव्हवेळी २३ वर्षीय मॉडेलची हत्या, 'डिलिवरी बॉय' आला अन् गोळी घातली, व्हिडिओ व्हायरल

वीकेंडला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुण्यासह ठाण्यात पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुढील तीन दिवस हलक्या पावसाची नोंद होईल. राज्यातील किमान तापमानात बदल अपेक्षित नाही. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, विशेषत: घाटमाथा आणि ग्रामीण भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com