Mexican Influencer Valeria Márquez Shot Dead : मेक्सिकोमधील जलिस्कोमध्ये २३ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण देशाला हादरून सोडले. येथील जापोपान शहरात मंगळवारी २३ वर्षीय प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल वलेरिया मार्केज हिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, वलेरिया मार्केज हिच्यावर ब्युटी सलूनमध्ये टिकटॉक लाइव्हस्ट्रीमदरम्यान गोळी धाडली. 'डिलिवरी बॉय'ने वलेरिया हिला गोळी धाडल्याचे समोर आलेय.
लाइव्हस्ट्रीमदरम्यान गोळ्या झाडल्या
वलेरिया लाइव्हस्ट्रीमदरम्यान डिलिव्हरी बॉयसोबत बोलत होती. त्याचवेळी अचानक तिच्यावर हल्लेखोराने गोळ्या झाडल्या. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोराने वलेरियाच्या छाती आणि डोक्यात गोळ्या मारल्या. ती जागीच कोसळली. ही भयंकर घटना सीसीटीव्ही लाईव्ह स्ट्रीमिंगवेळी रेकॉर्ड झाली. धक्कादायक म्हणजे, या हत्येच्या काही तासांनंतरच पीआरआय पक्षाचे माजी खासदार लुइस आर्मांडो कॉर्डोवा डियाज यांची कॅफेमध्ये गोळी मारून हत्या करण्यात आली. या दोन्ही हायफ्रोफाईल घटनांमुळे जापोपान आणि आजूबाजूच्या परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
वलेरियाच्या हत्येच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. त्याशिवाय चाहत्यांकडून शोक संदेशांचा पूर आला आहे. या क्रूर हत्येचा लोकांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. लाइव्हस्ट्रीमदरम्यान घडलेली हत्या केवळ वलेरियाच्या चाहत्यांसाठीच नव्हे, तर संपूर्ण मेक्सिकोसाठी मोठा धक्का आहे. सध्या पोलिस आणि तपास यंत्रणा हत्येच्या उद्देशाचा शोध घेण्यासह हल्लेखोराचा शोध घेत आहेत.
नेमकी कोण आहे वलेरिया मार्केज ? Who was Valeria Márquez?
वलेरिया मार्केज ही २३ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होती, जी सौंदर्य आणि मेकअप सामग्री ऑनलाइन शेअर करायची. तिचे इन्स्टाग्रामवर १४९,००० आणि टिकटॉकवर ११४,००० फॉलोअर्स होते. तिच्या अलीकडील पोस्ट्सवर चाहत्यांनी शोक व्यक्त केला. मेक्सिकोच्या जालिस्को राज्यातील तिच्या ब्लॉसम द ब्युटी लाउंज सलूनमधून लाइव्हस्ट्रीमिंग करताना तिच्यावर गोळीबार झाला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.