Pimpri-Chinchwad Mini Bus Fire 
मुंबई/पुणे

Mini Bus Fire Case: आग लागली नव्हे तर लावली; टेम्पो ट्रॅव्हलर चालकानंच केला घात, हिंजवडीत जळालेल्या बसच्या तपासात धक्कादायक खुलासा

Pimpri-Chinchwad Mini Bus Fire: टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला आग लागण्याच्या प्रकरणात आता एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे टेम्पो ट्रॅव्हलर ला लागलेली आग हा अपघात नसून हा घातपात असल्याचा आता प्राथमिक पोलीस तपासात उघडकीस आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गोपाल मोटघरे, साम प्रतिनिधी

हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला आग लागून चार जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आलीय. मिनी बस चालकानेच घातपात केल्याचं पोलिसांनी सांगितलंय. टेम्पो ट्रॅव्हलरचा वाहन चालक जनार्दन हबर्डीकर यानेच हा घातपात केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आले आहे. अपमानास्पद वागणूक आणि कमी मानधन मिळाल्याच्या रागातून मिनी बस चालकानेच बस पेटवल्याचा उलगडा पोलिसांच्या प्रथम तपासणीत झालाय.

व्योमा ग्राफिक्स कंपनीकडून दिवाळीत मिळालेलं कमी मानधन तसेच कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून मिळालेली अपमानास्पद वागणुकीचा बदला घेण्यासाठी वाहन चालकाने हा घातपात घडवून आला. चालक जनार्दन हंबर्डीकर याने बेंजामिन केमिकल आणि काही कापडी तुकड्यांचा वापर करत बस पेटवली. आगीने भडका घेतल्यानंतर त्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बसच्या बाहेर उडी मारली होती, असं प्राथमिक तपासून उघडकीस आले आहे.

व्योमा ग्राफिक्स कंपनीमध्ये ग्राफिक्स काम केलं जातं. ग्राफिक्स मशीन पुसण्यासाठी जे बेंजामिन केमिकल वापरलं जाते. हेच बेंजामिन केमिकल जनार्दन हंबर्डे याने आपल्या कंपनीतून चोरून आणल होतं. त्याने हे केमिकल ड्रायव्हर सीटच्या खाली ठेवलं होतं. बसला आग लावण्याचं कारस्थान हे पूर्वनियोजित होतं. प्लानिग करूनच चालकाने घातपात घडवून आणला असं पोलिस तपासात समोर आले आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर पोलिसांचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT