Pimpri Chinchwad Police Somnath Zende will be interrogated on 1.5 Crore won in Dream11 game Saam TV
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad: ड्रीम ११ वर टीम बनवून दीड कोटी जिंकले, पण... पिंपरी चिंचवडचे PSI अडचणीत का आले?

Satish Daud

Police Officer Dream 11 Won

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी ड्रीम ११ या ऑनलाइन गेममध्ये तब्बल दीड कोटींचे बक्षीस जिंकलं. ही बातमी महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली. करोडपती झाल्यावर अनेकांनी झेंडे यांचे अभिनंदन केले, तर काहींनी यावर आक्षेप देखील घेतला. त्यामुळे सोमनाथ झेंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

ऑनलाइन जुगार खेळणारे पोलीस उपनिरीक्षक (Police) सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करणारे पत्र भाजपाचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलं आहे. त्यांच्या या पत्राची काही तासातच पिंपरी- चिंचवड पोलिसांनी देखील दखल घेतली आहे.

कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी तपासून पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडे यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. झेंडे यांची चौकशी पोलीस उपायुक्त (Pimpri Chinchwad) स्वप्ना गोरे यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती पोलीस जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी इंग्लंड-बांग्लादेश सामन्यादरम्यान ड्रीम-११ च्या ऑनलाइन गेममध्ये अव्वल क्रमांक मिळवून दीड कोटींचं बक्षीस जिंकलं. सुरुवातीला झेंडे यांना यावर विश्वास बसला नाही. मात्र, खात्यावर पैसे जमा होत असल्याने त्यांना खात्री पटली. त्यांनी तातडीने ही आनंदाची बातमी कुटुंबियांसह मित्रमंडळींना दिली.

बघता-बघता झेंडे यांनी दीड कोटींचं बक्षीस जिंकल्याची माहिती संपूर्ण राज्यभरात वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी फोन करुन तसेच सोशल मीडियावरुन झेंडे यांचे अभिनंदन केले. दरम्यान, मी पैसे जिंकले असले, तरी ऑनलाइन गेमिंग धोकादायक असल्याचं झेंडे यांनी सांगितलं. अशा गेम्सपासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT