Helicopter Crashes In Pimpri Chinchwad Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना, बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं; तिघांचा मृत्यू

Priya More

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) हेलिकॉप्टर कोसळल्याची (Helicopter Crashes) धक्कादायक घटना समोर आली आहे. या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बावधन परिसरातील केके राव डोंगराळ भागामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळले.

हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातामध्ये दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. ऑक्सफर्ड गोल्फ कोर्सजवळ असलेल्या हेलिपॅडपासून १.५ किमी अंतरावर हे हेलिकॉप्टर कोसळले. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. हे हेलिकॉप्टर कुठून कुठे जात होते, त्यामध्ये कोण प्रवास करत होते? या सर्व बाजूने पोलिस तपास करत आहेत.

पिंपरी -चिंचवडच्या बावधन बुद्रुक परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळले. बावधनच्या के. के कन्स्ट्रक्शन टेकडीवर ही घटना घडली. दाट धुक्यांमुळे डोंगराळ भागामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची ४ वाहनं घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या आहेत. हेलिकॉप्टर कोसळल्याची ही महिनाभरातील दुसरी घटना आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरेंना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर येत होते. पुण्याहून मुंबईला हे हेलिकॉप्टर येत होते. उड्डाणानंतर अवघ्या ३ मिनिटांतच हेलिकॉप्टर कोसळलं. ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीचे हे हेलिकॉप्टर होते. HEMRL संस्थेच्या परिसरात हेलिकॉप्टर कोसळले. पुणे पोलिसांकडून याचा तपास केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral News: वह स्त्री है, वह कुछ भी कर सकती है... महिलेने स्कुटी थेट मोमोजच्या गाड्यावर घातली, घटना सीसीटीव्हीत कैद!

Bigg Boss 18 : दयाबेनचा चक्क बिग बॉसला नकार, ६५ कोटीही धुडाकवले, नेमकं कारण काय?

Mumbai Underground Metro : मेट्रो लाईन ३ घडवणार इतिहास, आठ डब्यांसह धावणार स्वयंचलित मेट्रो, कसं आहे नवं तंत्रज्ञान?

Maharashtra News Live Updates: चंद्रपुरात ओबीसी महाएल्गार मेळावा,लक्ष्मण हाके, विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार

Navratri Utsav : भाविकांना २४ तास घेता येणार कालिका मातेचे दर्शन; नवरात्रोत्सवानिमित्त देवस्थानाचा निर्णय

SCROLL FOR NEXT