Pune Viral Video: आधी काच खाली घे मग बोल, पुण्यात रिक्षाचालकाची दादागिरी; भररस्त्यात कारवर हल्ला

Viral Video: सोशल मीडियावर कायम अनेक वादविवादाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.
 Viral Video
Pune Viral VideoSaam Tv
Published On

Fighting Video: पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणून कायम ओळखले जाते. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून याच पुणे शहरात अनेक हाणामारी तर कधी गंभीर गुन्हे एवढच नाही तर अनेक खुनाच्या घटना वाढत आहेत. सोशल मीडियावर सर्व घटनांचे सीसीटीव्ही फुटेज कायम व्हायरल होत असतात. सध्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर पुणे शहरातील एका हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. जिथे नक्की काय झाले असेल ते तुम्ही पाहाच

व्हायरल(Viral) होत असलेली संपूर्ण हाणामारीची (Fighting) घटना पुणे शहरातील आहे. व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये संपूर्ण घटनेची माहिती सांगण्यात आलेली आहे. त्यात लिहिले आहे की,''संपूर्ण घटना २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५.३० दरम्यान घडलेली आहे. जी औंध मिलिटरी स्टेशनच्या गेट बाहेर रक्षक चौकाजवळील आहे.

जिथे एक व्यक्ती पत्नीला घेण्यासाठी पुनावळे ते खराडीकडे निघालेल्या एका कार चालकाला रिक्षाचालकाकडून आक्रमक वागणूक मिळाली. त्यानंतर यांनी औंध रोडवर ऑटोरिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा हाणामारी सुरू झाली. सर्व तणाव येवढा वाढला, ज्यामुळे ऑटो चालकाने वर्मा यांच्या कारला धक्काबुक्की केली आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न केला.

कारचालकाने सांगवी पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद देऊन घटनेची माहिती दिली. मात्र, अद्याप ऑटोचालकावर कोणतीही कारवाई झालेली नाही. या वादामुळे रस्ता सुरक्षेबद्दल आणि परिसरातील रस्त्यावरील संतापाच्या वाढत्या समस्येबद्दल चिंता निर्माण झाली आहे. स्थानिक रहिवाशांना अशा घटनांचे निराकरण करण्यासाठी आणि सुरक्षित ड्रायव्हिंग वातावरण सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांच्या त्वरीत हस्तक्षेपाची अपेक्षा आहे'' असे कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलेले आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेला आहे. मात्र तो इन्स्टाग्रामवरील ''@punepulse'' या अकाउंटवर पोस्ट एका दिवसाआधी करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच पुणे शहर आणि अन्य शहरात या व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच तब्बल १ हजारहून अधिक नेटकऱ्यांनी व्हिडिओला पसंती दिलेली आहे तर अनेक व्ह्यूज व्हिडिओला मिळत आहेत. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''ऑटो वाले कमी नाहीयेत दमदाटी करतो'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''पुणे पोलिसांनी कारवाई का केली नाही''.

 Viral Video
Viral Video: एक शेर तर दुसरी सव्वाशेर, मुंबई लोकलमध्ये तरुणींचा धमाकेदार डान्स; पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com