पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरात पुणे-बँगलोर महामार्गावर रविवारी रात्री एका टँकरला भीषण आग लागली. प्रोपिलीन गॅस भरलेल्या या टँकरला आग लागली. आगीने रौद्र रुप धारण केल्यानंतर गॅसने भरलेल्या सिलिंडरचेही स्फोट झाले. त्यामुळे रात्रभर नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण होतं.
घटनेची माहिती मिळताच वाकड, हिंजवडी, रावेत परिसरात गस्त घालणारे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच अग्निशमन दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. (Latest Marathi News)
प्राथमिक माहितीनुसार, ताथवडे परिसरातील जेएसपीएम महाविद्यालयाजवळ मे. तिरूपती करियरचे 21 टन क्षमतेच्या प्रोपिलीन गॅसची अवैधरित्या भरणा घरगुती 14.2kg आणि कमर्शियल सिलेंडरमध्ये करण्यात येत होता.
यामध्ये गॅसची गळती झाल्यानंतर आग लागली असावी. त्यानंतर भीतीपोटी कार्यरत कर्मचारी घटनास्थळावरुन पळून गेले असावे. या घटनेत कुणीही जखमी झाल्याची माहिती नाही. (Pune News)
मात्र या आगीत जेएसपीएम महाविद्यालयाजवळ उभ्या असलेल्या 4-5 महाविद्यालयाच्या बसेस पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पिंपरी, थेरगाव, प्राधिकरण, राहटणी, चिखली, भोसरी,तळवडे अग्निशमन पथके त्याचप्रमाणे हिंजवडी MIDC आणि PMRDA चे कर्मचारी देखील मदतीसाठी धावून आले होते. आग पूर्णपणे विझली असून कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.