Manasvi Choudhary
स्वंयपाकघरात बटाटे जास्त दिवस साठवून ठेवल्यास बटाट्यांना कोंब फुटतात आणि ते हिरवे पडतात
अनेकजण बटाट्यांना कोंब आल्यानंतर ते काढून जेवणासाठी बटाटे वापरतात. परंतु कोंब आलेले बटाटे खावे की नाही, आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
कोंब काढून बटाटे वापरत असाल तर ते चुकीचे आहे. आरोग्याच्या दृष्टीने कोंब आलेले बटाटे खाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.
बटाट्यांना कोंब फुटतात तेव्हा त्यात 'सोलेनिन आणि 'चॅकोनिन' नावाचे विषारी ग्लायकोअल्क्लॉइड्स तयार होतात. हे घटक शरीरासाठी विषारी ठरू शकतात.
जास्त कोंब आलेले किंवा हिरवे झालेले बटाटे खाल्ल्यास पोटात तीव्र दुखणे, मळमळ होणे, उलट्या होणे आणि जुलाब यांसारख्या अन्विषबाधेच्या (Food Poisoning) समस्या उद्भवू शकतात.
ज्या बटाट्यांना कोंब आले असतात ते आतून मऊ आणि खराब होतात. त्यावर बुरशी वाढू शकते, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती बिघडू शकते.
बटाटे कधीही उन्हात किंवा ओल्या जागी ठेवू नका.
बटाटे नेहमी थंड, कोरड्या आणि अंधाऱ्या जागी (जसे की हवेशीर बास्केटमध्ये) साठवावेत.
कांद्यासोबत बटाटे एकत्र ठेवणे टाळावे, कारण कांदे सोडणारे वायू बटाट्यांना लवकर कोंब आणतात.