Mla Mahesh Landge News Saam TV
मुंबई/पुणे

Mla Mahesh Landge : भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

साम टिव्ही ब्युरो

Mla Mahesh Landge News : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांना ३० लाख रुपयांच्या खंडणीचा मॅसेज आला आहे. महेश लांडगे यांच्या कार्यालयातील मोबाईलवर खंडणीचा मागणी करणारा हा मेसेज आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  (Latest Marathi News)

याबाबत आमदार महेश लांडगे यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. भाजप आमदार महेश लांडगे यांची नागरिकांच्या मदतीसाठी ‘परिवर्तन’ या नावाची हेल्पलाइन आहे. (Breaking Marathi News)

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास या हेल्पलाइन नंबरवर एक संदेश आला. त्यामध्ये ३० लाख रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली होती. त्याचबरोबर ही खंडणी न दिल्यास मारण्याची धमकी देखील देण्यात आली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

आमदार महेश लांडगे यांनी विविध समस्या नागरिकांना मांडता याव्यात यासाठी एक माबाईल क्रमांक दिलेला आहे. या मोबाईलवर ३० लाख रुपयांची खंडणी मागणारा मेसेज आला आहे. त्यामध्ये महेश लांडगे यांचे नाव असून जिवे मारण्याचीही धमकी देण्यात आली आहे. (Maharashtra Political News)

दरम्यान, त्या मॅसेजमध्ये बँक डिटेल देखील देण्यात आली आहे. संबंधित बँक खात्यात पैसे जमा करण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच इतर रक्कम ही एका ठिकाणी गाडीत ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. संबंधित मेसेज आमदारांच्या सोशल मीडिया टीमला समजताच एकच खळबळ उडाली. याप्रकरणाचा भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज धाडसाने अनेक गोष्टी कराल, नको ती जबाबदारी अंगावर येऊन पडणार; वाचा आजचे राशीभविष्य

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT