Pimpri-Chinchwad Crime : नवा बॉयफ्रेंड बनवल्याने प्रियकर भडकला, प्रेयसीसोबत केलं भयानक कृत्य

Pune Crime News : पिंपरी चिंचवड शहरातून एक भयानक घटना उघडकीस आली आहे.
Pimpri-Chinchwad Crime News
Pimpri-Chinchwad Crime NewsSaam TV
Published On

Pimpri-Chinchwad Crime : पिंपरी चिंचवड शहरातून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. येथील चिखली परिसरातून तीन दिवसांपूर्वी एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. या मुलीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला असून तिची हत्या झाल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Pimpri-Chinchwad Crime News
Gautami Patil News : मी इंदुरीकर महाराजांची मोठी फॅन; गौतमी पाटीलने एका वाक्यातच विषय संपवला

अल्पवयीन मुलीने दुसरा बॉयफ्रेंड बनवल्याच्या रागातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. मुलीच्या मृतदेहावर वार केल्याच्या खुणा होत्या. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे.  (Breaking Marathi News)

अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली असल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत दिली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी (Police) तातडीने तपासाची चक्रे फिरवली. मंगळवारी पोलिसांना चिखली, घरकलू परिसरातील सांस्कृतिक भवनच्या चालू बांधकाम साईटजवळ अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला.

त्या मृतदेहावार धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा दिसत होत्या. या मुलीची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलिसांनी तातडीने सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं.

Pimpri-Chinchwad Crime News
Shivshahi Bus Accident : पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात; 13 प्रवासी जखमी, VIDEO

त्यांची कसून चौकशी केली असता, आपणच मुलीचा खून (Crime News) केल्याचं त्यांनी कबुल केलं आहे. यातील एकाने सांगितलं की, त्याचं या अल्पवयीन मुलीवर प्रेम होतं. मात्र, काही दिवसांनी तिने दुसरा बॉयफ्रेंड बनवला होता. याचाच राग त्याच्या मनात होता. त्यामुळे तिला भेटायला बोलावण्याचा बहाण्याने तिच्यावर कोयत्याने सपासप वार करून तिचा खून केला.

दरम्यान, प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याचं उघड होताच, चिखली परिसर हादरून गेला आहे. अल्पवयीन मुलांनी असे कृत्य करणे म्हणजे चुकीची बाब आहे. या वयात चांगला अभ्यास करून आपल्या भवितव्यकडे लक्ष देणे तेवढेच गरजेचे आहे. मात्र अशा घटनमुळे समाजात जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com