Gautami Patil News : मी इंदुरीकर महाराजांची मोठी फॅन; गौतमी पाटीलने एका वाक्यातच विषय संपवला

Gautami Patil vs Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराज यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणं टाळत गौतमी पाटीलने वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला
Gautami Patil On Indurikar Maharaj
Gautami Patil On Indurikar MaharajSaam TV
Published On

Gautami Patil On Indurikar Maharaj : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज देशमुख यांनी अलीकडेच प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या मानधनावरून जाहीर कीर्तनातून टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर सोशल मीडियामध्ये प्रतिक्रिया उमटल्या होत्या. दरम्यान, इंदुरीकर महाराज यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देणं टाळत गौतमी पाटीलने वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.  (Latest Marathi News)

Gautami Patil On Indurikar Maharaj
Aaditya Thackeray News : मी गद्दार गँगचं कौतुक करायला आलोय; आदित्य ठाकरे असं का म्हणाले?

अनेक लोक आहेत. मी सुद्धा महाराजांची फॅन आहे, असे म्हणत तिने इंदुरीकर महाराजांनी मानधनाविषयी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देणं टाळलं आहे.

"इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं की, मी एका कार्यक्रमासाठी तीन लाख रुपये घेते. मात्र, मी एवढं मानधन घेत नाही. मी त्यांनी नेमकं काय म्हटलं हे अजून नीट ऐकलं नाही, तसेच आमच्या टीममध्ये ११ मुली आहेत. आमची एकूण २० जणांची टीम आहे. या सर्वांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे मानधन आम्ही घेतो. पण महाराज सांगतात तेवढं घेत नसल्याचं गौतमी पाटीलने सांगितले आहे". (Breaking Marathi News)

Gautami Patil On Indurikar Maharaj
Shivshahi Bus Accident : पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात; 13 प्रवासी जखमी, VIDEO

त्याचबरोबर मी त्यांची खूप मोठी फॅन आहे. जेवढं माझ्यावर प्रेक्षकांचं प्रेम आहे, महाराजांवरही तेवढंच प्रेक्षक प्रेम करतात. असे म्हणत, गौतमीने इंदुरीकरांबद्दल आदर व्यक्त केला. मी आगामी घुंगरू चित्रपटात नृत्यांगनेच्या जीवनावर आधारित भूमिका केली आहे. पुढील काळात नक्कीच समाज सुधारणा बद्दल कामं करण्याची इच्छा असल्याचे गौतमी पाटीलने सांगितले आहे.

इंदुरीकर महाराज काय म्हणाले होते?

गौतमीच्या तीन गाण्यासाठी तीन लाख मोजण्याची तयारी असते पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही. आम्ही फक्त 5 हजार रुपये वाढवून मागितले तर आमच्यावर बाजार मांडल्याचा आरोप करतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी, राडा तर तर काहींचे गुडघे फुटतात. पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागतो. गौतमीला संरक्षण दिलं जातं.आम्हाला संरक्षण नसतं, अशी टीका इंदुरीकर महाराज यांनी केली होती.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com