Eknath shinde and uddhav thackeray Saam tv
मुंबई/पुणे

Political News : उद्धव ठाकरेंना पुन्हा एक धक्का, आणखी एका नेत्याचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश

सूरज सावंत

Mumbai News : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची गळती काही केल्या थांबत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे. ठाकरेंच्या आणखी एका विभाग संपर्कप्रमुखाने शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.

पिंपरी-चिंचवडचे संपर्कप्रमुख व सिनेट सदस्य, तसेच युवा सेनेचे विस्तारक अॅड. वैभव थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावेळी मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती यशवंत जाधव व मारुती साळुंखे हे उपस्थित होते. (Latest Marathi News)

मारूती साळुंखेंचा शिवसेनेत प्रवेश

काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेचे व प्रशासकिय कामातील माहितगार मारूती साळुंखेंनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत  शिवसेनेत प्रवेश केला होता. मारूती साळुंखे हे ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांच्या जवळचे मानले जातात. शिवसेना संघटना बांधण्यात व प्रशासकिय कामात मारूती साळुंखे यांचा महत्वाचा वाटा असल्याचे बोलले जाते.

मारूती साळुंखे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्ष बांधणीच्या कामात बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षप्रवेशावेळी बोलून दाखवला होता. यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे व माजी नगरसेविका शितल म्हात्रे या उपस्थित होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Healthy Food : ब्राऊन की व्हाईट, कोणता ब्रेड शरीराला हानिकारक? वेळीच सावध व्हा नाहीतर...

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

SCROLL FOR NEXT