Breaking : शरद पवारच राष्ट्रीय अध्यक्ष राहण्याची शक्यता; उद्याच्या बैठकीत कार्यकारी अध्यक्ष नेमणार?

NCP President: राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवारच राहतील अशी शक्यता असून उद्याच्या बैठकीत पक्षाचा कार्याध्यक्ष नेमण्याचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
Sharad pawar
Sharad pawar saam tv
Published On

Sharad Pawar will Continue as NCP President: राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवारच राहतील अशी शक्यता आहे. आगामी २०२४ निवडणुकीपर्यंत शरद पवार यांनी अध्यक्षपदी राहावे असा प्रस्ताव उद्याच्या बैठकीत येण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीत पक्षाचा कार्याध्यक्ष नेमण्याचा प्रस्ताव देखील मांडण्यात येणार आहे अशी माहिती खात्रीलाय सूत्रांकडून मिळाली आहे.

सध्या राज्यातील राजकारणातील केंद्र बिंदू ठरलेल्या शरद पवार यांनी आपल्या निर्णयाने सगळ्यांनाच हादरा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाने फक्त राष्ट्रवादी पक्षच नाही तर सगळ्याच राजकीय पक्षांसह सामान्य माणसांनाही धक्का बसला आहे. गेल्या अनेक दशकांपासून राज्याचं राजकारण शरद पवार यांच्या अवतीभवती फिरत आहे. अशातच त्यांच्या या निर्णयाने सगळ्यांनाच धक्का बसला.

Sharad pawar
Buldhana News: शरद पवारांच्या आवाहनानंतरही राजीनामा सत्र सुरुच, बुलडाण्यात राष्ट्रवादीच्या 80 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

उद्याच्या बैठकीत निर्णय होण्याची दाट शक्यता

शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. यातच आज शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना ''एक-दोन दिवसानंतर निर्णय सांगतो'' असे सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत उद्याच्या बैठकीत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

कार्याध्यक्ष नेमणार?

राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा प्रस्ताव उद्याच्या बैठकीत मांडला जाण्याची शक्यता आहे. या पदासाठी प्रामुख्याने चार नावे समोर येत आहेत. यात पहिलं नाव सुप्रिया सुळे यांचं असून दुसरं नाव हे अजित पवार यांचं आहे. याशिवाय प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांची नावं देखील चर्चेत आहे.

Sharad pawar
EXPLAINER: शरद पवार एक-दोन दिवसांत नेमका कोणता निर्णय घेऊ शकतात?

कार्याध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण?

परंतु नुकताच सकाळ-साम सर्व्हे करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व म्हणून तुम्ही कुणाला पसंती द्याल? या प्रश्नावर सर्वपक्षीय समर्थकांनी आपले मत नोंदवले. त्यानुसार या सर्वेक्षणात सुप्रिया सुळे यांच्या नावाला सर्वाधिक ३५ टक्के लोकांनी पसंती दर्शवली, तर अजित पवार यांच्या नावाला ३२ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. याशिवाय प्रफुल्ल पटेल यांच्या नावाला १७ टक्के लोकांनी पसंती दर्शवली होती. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com