Buldhana News: शरद पवारांच्या आवाहनानंतरही राजीनामा सत्र सुरुच, बुलडाण्यात राष्ट्रवादीच्या 80 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

Latest News: नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वच जण राजीनामे द्यायला लागले आहेत.
Sharad Pawar Resigns Latest Update
Sharad Pawar Resigns Latest UpdateSaam TV
Published On

NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्ष पदावरुन पायउतार होण्याची घोषणा केल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी त्याच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वच जण राजीनामे द्यायला लागले आहेत. हे सर्वजण राजीनामा देत शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करत आहे. या राजीनाम्याचे सत्र सुरुच आहे. अशामध्ये आता बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या 80 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.

Sharad Pawar Resigns Latest Update
Jayant Patil On Sharad Pawar: 'साहेब नसल्यास पक्षात न्याय मिळेल की नाही याची कार्यकर्त्यांना भीती', जयंत पाटलांनी सांगितलं पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे कारण

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आवाहन केल्यावरही राजीनामा सत्र सुरूच आहे. बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या 80 पदाधिकाऱ्यांनी आज आपल्या पदांचे राजीनामे दिले. जिल्ह्यातील 13 तालुक्यातील राष्ट्रवादी तालुका अध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज आपल्या पदाचे राजीनामे दिले. या सर्वांनी आपले राजीनामे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी दिली आहे.

Sharad Pawar Resigns Latest Update
Sharad Pawar Latest News: मोठी बातमी! पुढील २ दिवसांत अंतिम निर्णय घेऊ, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागेल आहे. राष्ट्रवादीच्या जवळपास सर्वच नेत्यांना शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. राज्यातील अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसंच दोन दिवसांत निर्णय नाही आला तर उपोषणाला बसू असा देखील इशारा त्यांनी दिली आहे. पण शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. अशामध्ये नाराज पदाधिकारी राजीनामा देत आहेत. या राजीनाम्याचे सत्र सुरुच आहेत.

Sharad Pawar Resigns Latest Update
NCP workers protest : साहेब, ८ दिवसांनी पुन्हा राजीनामा द्या! पण... राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा भलताच हट्ट, थेट झाडावरच चढला

शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी राजीनामा दिला. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. जितेंद्र आव्हाडांसह ठाण्यातील राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. तर आज कल्याण - डोंबिवलीचे जिल्हा कार्याध्यक्ष वंडार पाटील, राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष सुधीर पाटील यांनी राजीनामा पक्षवरिष्ठांना पाठवले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी राजीनामे का देत आहेत यामागचे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत सांगितले. 'पवारसाहेब नसतील तर पक्षात आपल्याला न्याय मिळेल की नाही याची भीती त्यांना वाटत आहे. म्हणून ते राजीनामा देत आहेत.', असे जयंत पाटील यांनी सांगितले. तसंच, 'माझ्याकडे आणि पक्षकार्यालयाकडे अनेक जणांचे राजीनामे आले आहेत. माझ्या संपर्कात ज्यांचे मोबाईल नंबर आहेत त्यांचे राजीनामे आले आहेत. तर काहींना पक्षकार्यालयाकडे राजीनामे पाठवले आहेत.', असं देखील त्यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com