NCP workers protest : साहेब, ८ दिवसांनी पुन्हा राजीनामा द्या! पण... राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा भलताच हट्ट, थेट झाडावरच चढला

NCP workers protest for Sharad Pawar : अजित दादा आणि सुप्रिया सुळे सर्व कार्यकर्त्यांची मनधरणी करत आहेत. परंतु कार्यकर्ते मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत.
NCP workers protest by climbing tree
NCP workers protest by climbing treesaam tv
Published On

>> कैलास चौधरी, साम टीव्ही

NCP workers protest by climbing tree : शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आदोलन करण्यास सुरुवात केली आहे. कुणी उपोषण करतोय, तर कुणी धरणे आंदोलन सुरु केलंय. अजित दादा आणि सुप्रिया सुळे या सर्व कार्यकर्त्यांची मनधरणी करत आहेत. परंतु कार्यकर्ते मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत.

शरद पवारच आमचे नेते आणि आमचे दैवत आहे. त्यांना पदावर परत आलंच पाहिजे म्हणत कार्यकर्ते पवारांकडे पुन्हा पक्षाध्यक्षपदावर येण्याचा आग्रह धरताहेत. एकप्रकारे कोण जास्त निष्ठावान अशी स्पर्धाच कार्यकर्त्यांमध्ये रंगलीय. मात्र काही कार्यकर्त्यांनी हद्दच केलीय. काहींनी रक्ताने पत्र लिहून पवारांचं मन वळवण्याचा प्रयत्न केलाय, तर काहींनी अन्नत्याग केलाय. मात्र एका कार्यकर्त्याने तर हद्दच केलीये.

NCP workers protest by climbing tree
Pune News: PMPML ची नवी बससेवा! आता AC बसमधून आरामात करा 'पुणे दर्शन'; जाणून घ्या वेळापत्रक आणि तिकीट दर...

धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील बळवंत थिटे यांनी आपल्या शेतातील चिंचेच्या झाडावर चढून सत्याग्रह आंदोलन सुरू केल आहे. या कार्यकर्त्याची मागणी ऐकूण तर शरद पवारही डोक्याला हात मारतील. अजित पवारांनी या कार्यकर्त्याची मागणी ऐकली तर ते मुंबईतल्या कार्यकर्त्याप्रमाणे याच्या डोक्यात टपली मारल्याशिवाय राहणार नाहीत.

लोहारा तालुक्यातील बळवंत थिटे यांनी शरद पवारांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे सत्याग्रह आंदोलन सुरू केलं आहे. आपल्या आंदोलनाकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी ते थेट चिंचेच्या झाडावर चढले आहेत. शरद पवारांनी फक्त स्वतःच्या घरातील नातेवाईकांना सांगून हा राजीनामा दिला असून इतर कोणालाही त्यांनी विश्वासात घेतलं नाही. म्हणून मी हे सत्याग्रह आंदोलन सुरू केलंय असे त्यांनी सांगितले. (NCP workers protest)

NCP workers protest by climbing tree
UPI आणि UPI Lite मध्ये काय आहे फरक? पैशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणता आहे बेस्ट?

तसेच, शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता असं मतही त्यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे शरद पवारांनी आता पुन्हा अध्यक्ष पदावर परतावं, आठ दिवस काम करावं, पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं आणि हवं तर त्यानंतर पुन्हा पदाचा राजीनामा द्यावा अशी भलतीच मागणी थिटे यांनी केली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com