Pimpari Chinchwad Police Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpari Chinchwad: ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाची आत्महत्या, तपासातून धक्कादायक माहिती उघड; पोलिसांनी उद्धवस्त केलं सेक्सटॉर्शनचे कॉल सेंटर

Pimpari Chinchwad Police: कॉल गर्ल्सच्या बनावट अकाउंटद्वारे पीडित तरुणांकडे सेक्सटॉर्शन करत लाखो रुपये उकळणाऱ्या पश्चिम बंगालमधील टोळीचे कॉल सेंटर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी उध्वस्त केले आहे.

Priya More

गोपाल मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pimpari Chinchwad Police) सेक्सटॉर्शन चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. गुगलवर मुलींच्या फोटोच्या सहाय्याने कॉल गर्ल्सचे बनावट अकाउंट तयार करुन तरुणांची फसवणूक केली जात होती. कॉल गर्ल्सच्या बनावट अकाउंटद्वारे पीडित तरुणांकडे सेक्सटॉर्शनद्वारे पैसे उकळणाऱ्या पश्चिम बंगालमधील (West Bengal) टोळीचे कॉल सेंटर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी उध्वस्त केले आहे. याप्रकरणी पोलिांनी ६ जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पोलिस पथकाने दिघी पोलिसांच्या मदतीने ही मोठी कारवाई केली आहे. पोलिसांच्या पथकाने कोलकाता येथे सेक्सटॉर्शन चालविणाऱ्या एका कॉल सेंटरवर गुप्तपणे धाड टाकली. पोलिसांनी या सेक्सटॉर्शन गुन्ह्यात सहभागी असलेल्या सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच कॉल सेंटरमधून १५ स्मार्टफोन, ७ व्हाईस चेंज मोबाईल, ४० सिमकार्ड, १४ पेमेंट डेबिट कार्ड, ८ आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि ८ नोटबुक असा एकूण ४ लाख ८४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुरज कुमार जगदीश सिंग, नवीनकुमार महेश राम, सागर महेंद्र राम, मुरली हिरालाल केवट, अमरकुमार राजेंद्र राम, आणि धीरणकुमार राजकुमार पांडे या सहा जणांना अटक केली. यातील आरोपींनी १५ मे रोजी पिंपरी चिंचवड शहरातील डुडुळगाव येथे राहणाऱ्या किरण नामदेव दातीर याच्याकडे सेक्सटॉर्शनची मागणी केली होती. सेक्सटॉर्शनचा शिकार झालेल्या किरणने आत्महत्या केली होती.

आत्महत्या केलेल्या किरण नामदेव दातीर याचे व्हाट्सअ‍ॅप डीपीवरील फोटो अश्लील मॉर्फ करून त्याच्याकडे सेक्सटॉर्शनमध्ये ५१ लाख रूपये इतकी खंडणीची मागणी आरोपींनी केली होती. त्यामुळे सेक्सटॉर्शन करणाऱ्या आरोपीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून किरण नामदेव दातीर याने स्वतःच्या राहत्या घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

याप्रकरणात किरण नामदेव दातीरचा मावसभाऊ सौरभ शरद वीरकर याने दिघी पोलिस स्टेशनमध्ये सेक्सटॉर्शन उकळणाऱ्या आरोपी विरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना पिंपरी-चिंचवड शहरातील खंडणी विरोधी पथक आणि दिघी पोलिसांनी पश्चिम बंगाल येथे चालणारा सेक्सटॉर्शनचे कॉल सेंटरच उध्वस्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सीवूड्सच्या Nexus मॉलमधील आउटलेटमध्ये उंदीरांचा धुमाकूळ

Bullet Train: बुलेट ट्रेन लवकरच धावणार; मुंबई-अहमदबाद प्रवासाचे २ तास वाचणार, जाणून घ्या ट्रेनचा ताशी स्पीड अन् थांबे?

Maharashtra Politics : अजित पवारांच्या नेत्याकडून शरद पवार गटातील नेत्याला जीवे मारण्याची धमकी

Sanjay Raut: मराठी भाषा संदर्भात आम्ही हिंसाचार करणार काय उखाडायचे आहे उखाडा - संजय राऊत |VIDEO

Raksha Bandhan Special : बहिणींनो भावांसाठी प्लान करा सरप्राइज ट्रिप, कर्जतजवळ आहे भन्नाट पिकनिक स्पॉट

SCROLL FOR NEXT