Pimpari Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणाची गोळ्या झाडून हत्या, सांगवी परिसरात खळबळ

Youth Shot Dead In Pimpari Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये गोळीबाराची घटना समोर आली आहे. ३० वर्षीय तरुणावर भररस्त्यात गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे सांगवी परिसर हादरला आहे.
Pimpari Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणाची गोळ्या झाडून हत्या, सांगवी परिसरात खळबळ
Youth Shot Dead In Pimpari ChinchwadSaam Tv

गोपाळ मोटघरे, पिंपरी- चिंचवड

पिंपरी-चिंचवड (Pimpari Chinchwad) शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशामध्ये आणखी एक हत्येची घटना समोर आली आहे. पिंपरीच्या सांगवी परिसरामध्ये एका तरूणाची भररस्त्यात गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयामध्ये दाखल केले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील सांगवी पोलिस स्टेशनच्या हद्दीत तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली. अज्ञात व्यक्तीने या तरुणावर दोन राऊंड फायरिंग करण्यात आले. या गोळीबारामध्ये दीपक कदम (३० वर्षे) हा तरूण गंभीर जखमी झाला. घटनाची माहिती मिळतात सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Pimpari Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणाची गोळ्या झाडून हत्या, सांगवी परिसरात खळबळ
Pune Fire News : पुण्यात आगडोंब! कमला नेहरु पार्कजवळील इमारतीला भीषण आग..

गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तात्काळ औंध हॉस्पिलमध्ये दाखल करण्यात आले. पण या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भररस्त्यामध्ये ही गोळीबाराची घटना घडल्यामुळे सांगवी परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. दीपक कदम हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याचीच हत्या करण्यात आली आहे. दीपकवर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा शोध सांगवी पोलिसांकडून सुरू आहे.

Pimpari Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणाची गोळ्या झाडून हत्या, सांगवी परिसरात खळबळ
Pune Porsche Accident : ब्लड सॅम्पलची हेरफेर करणाऱ्या ससून रुग्णालयातील "त्या" दोन्ही डॉक्टरांचं निलंबन!

दरम्यान, भुसावळ शहरामध्ये देखील गोळीबाराची घटना घडली आहे. माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखोडे यांच्यावर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या गोळीबारामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर देखील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे भुसावळ शहर हादरले आहे. या घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Pimpari Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणाची गोळ्या झाडून हत्या, सांगवी परिसरात खळबळ
Pimpari Chinchwad News: पिंपरी चिंचवडमध्ये पोस्टर वॉर? चौकामध्ये लागलेल्या फ्लेक्सवर अश्विनी जगताप यांनी केला खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com