Pimpri Chinchwad Accident CCTV Video Saam TV
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad Accident: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव कारची महिलेला धडक; थरकाप उडवणारा अपघाताचा CCTV VIDEO व्हायरल

Pimpri Chinchwad Accident CCTV Video: पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा हिट अँड रनसारखी घटना घडली आहे. भरधाव कारने महिलेला उडवले. या अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Priya More

गोपाल मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा हिट अँड रनची (Pimpari Chinchwad Hit And Run) घटना घडली आहे. भरधाव कारने रस्त्या ओलांडणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये महिला ७ ते ८ फूट उंच उडून खाली पडली. या अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा अपघात होऊन २४ तास झाले तरी देखील गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमध्ये बुधवारी भरधाव कारने एका महिलेला धडक दिली. एमआयडीसी भोसरी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील स्वराज्य सिटी समोर ही घटना घडली. एका भरधाव कारने आपल्या मुलींसोबत रस्त्या ओलांडणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या धडकेत महिला जवळपास ७ ते ८ फूट उंचावर उडून खाली पडली. या अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झाली.

अपघातानंतर जखमी महिलेला स्वतः कारचालकाने खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. या अपघात प्रकरणात सध्या एमआयडीसी भोसरी पोलिस स्टेशनमध्ये कारचालका विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. हिट अँड रन प्रकरणाला २४ तास उलटल्यानंतर ही कार चालकाविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

अपघाताची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. थरकाप उडवणारा अपघाताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी भागात देखील अशाच प्रकारची अपघाताची घटना घडली होती. रस्त्याच्या कडेला फोनवर बोलत उभ्या राहिलेल्या महिलेला एका कारने जोरदार धडक दिली होती. या अपघातामध्ये देखील ही महिला गंभीर जखमी झाली होती. हा अपघात घडल्यानंतर प्रसार माध्यमांना बातमी आल्यानंतर त्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...' गणेश गल्ली, तेजुकाया अन्.. मुंबईतील गणरायाच्या विसर्जनाला सुरूवात

Ganpati Visarjan 2025: मुंबई ते दिल्ली गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी 'हे' आहेत शुभ मुहूर्त; जाणून घ्या सविस्तर

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करू नका; 10 दिवसांची पुजा ठरेल व्यर्थ

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT