Pimpari -Chinchwad Car Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpari Chinchwad Hit-And-Run Case: कारने चिमुकल्याला ५० फूटांपर्यंत फरफटत नेलं, भयानक अपघात CCTV मध्ये कैद

Pimpari -Chinchwad Car Accident: पिंपरी -चिंचवड शहरातील चरोहली परिसरामध्ये हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Priya More

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

Pimpari Chinchwad News: पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) हिट अँड रन प्रकरण (Hit-And-Run Case) समोर आलं आहे. मद्यपी कार चालकाने सात वर्षांच्या मुलाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी -चिंचवड शहरातील चरोहली परिसरामध्ये हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये (CCTV Camera) कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील चरोहली परिसरात १० ऑगस्टला रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. आळंदी - दिघी रोडवरील चरोहली परिसरामध्ये भरधाव कारने ७ वर्षांच्या चिमुकल्याला चिरडले. त्यानंतर या कारने या मुलाला ५० फूटांपर्यंत फरफटत नेलं. या अपघातामध्ये पार्थ भोसले या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

राहुल तापकीर हा १० ऑगस्टला रात्री ८ च्या सुमारास दिघी - आळंदी रोडवरून आपल्या अर्टिगा कारमधून जात होता. राहुल दारुच्या नशेमध्ये कार चालवत होता. त्याचवेळी राहुलच्या कारने पार्थ भोसले या चिमुकल्याला धडक दिली. त्यानंतर त्याने कार थांबवण्याऐवजी ती तशीच चालवत पुढे नेली. ५० फूटांपर्यंत त्याने पार्थला कारसोबत फरफटत नेले. ही घटना रस्त्यावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab : शिवाली परब विठ्ठल नामात दंग, पाहा मनमोहक फोटो

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

SCROLL FOR NEXT