Women Killed After Rejecting Marriage Saam Tv News
मुंबई/पुणे

Pimpari-Chinchwad Crime: उरणनंतर पिंपरी-चिंचवड हादरले! लग्नाला नकार दिला, रागाच्या भरात तरुणाने तरुणीसोबत केलं भयंकर कृत्य

Women Killed After Rejecting Marriage: रविवारी रात्री प्राची माने नावाच्या तरुणीवर धारधार शस्त्राने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्राचीचा जागीच मृत्यू झाला होता.

Priya More

गोपाल मोटघरे, पिंपरी-चिंचवड

नवी मुंबईतल्या उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरण (Yashashri Shinde Case) ताजे असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) देखील धक्कादायक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. रविवारी रात्री प्राची माने नावाच्या तरुणीवर धारधार शस्त्राने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्राचीचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी प्राचीच्या मारेकराच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्राचीच्या गावामध्ये राहणाऱ्या तरुणानेच तिची हत्या केली असल्याचे तपासातून उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील महाळुंगे पोलिस स्टेशन हद्दीतील आंबेठाण येथे रविवारी रात्री प्राची विजय माने (२१ वर्षे) या तरुणीची हत्या करण्यात आली होती. एकतर्फी प्रेमातून प्राचीची हत्या करण्यात आली असल्याचे पोलिस तपासातून उघड झाले. अविराज रामचंद्र खरात असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

प्राची मानेच्या हल्लेखोराला अटक करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ३ पोलिस पथके तयार केली होती. अविराज खरातला पोलिसांनी अटक केली. प्राची माने सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उरण इस्लामपूर या गावची मूळ रहिवासी होती. त्याच भागातील अविराज रामचंद्र खरातला प्राचीने लग्नास नकार दिला होता.

त्यानंतर प्राची पिंपरी-चिंचवडच्या महाळुंगे पोलिस स्टेशन हद्दीतील आंबेठाण या भागात वास्तव्यास आली होती. प्राचीने लग्न करण्यास नकार दिल्याने अविराज खरात संतप्त झाला होता. संतापलेला अविराज आंबेठाण येथे प्राची राहत असलेल्या ठिकाणी आला आणि त्याने प्राचीच्या गळ्यावर आणि पोटावर धारदार चाकूने वार करून तिची हत्या केली. प्राचीच्या हत्येनंतर अविराज पसार झाला होता.

प्राचीच्या हत्येनंतर पिंपरी -चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला शोधण्यासाठी तीन पोलिस पथके तयार केली होती. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फूटेज लागले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही चेक करून आणि तांत्रिक विश्लेषन करून अविराजला अटक केली. अविराज सांगलीच्या दिशेने दुचाकीवरून पळून जात होता. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड हादरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

SCROLL FOR NEXT