Kalyan Dombivli Local Train: दिव्यांगाच्या डब्यात धडधाकट प्रवाशांची घुसखोरी; उभे राहण्यासही जागा नाही, Video आला समोर
Physically disabled passengers struggle to get inside the local train Kalyan Dombivli  Saam Digital
मुंबई/पुणे

Kalyan Dombivli Local Train: दिव्यांगाच्या डब्यात धडधाकट प्रवाशांची घुसखोरी; उभे राहण्यासही जागा नाही, Video आला समोर

Siddharth Latkar

- अभिजित देशमुख

कल्याण आणि डोंबिवलीमधील प्रवाशांना लाेकलमध्ये गर्दीच्या वेळेत प्रवेश करताना कसरत करावी लागते हे सर्वश्रुत आहे. परंतु आता दिव्यांग प्रवाशांना देखील जीवमुठीत धरुन रेल्वेत चढावे लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन 15 डब्यांची लोकल सुरू करण्याची मागणी कधी पूर्ण करणार असा सवाल प्रवाशांनी साम टीव्हीशी बाेलताना उपस्थित केला आहे.

कल्याण रेल्वे स्थानकातून दरराेज लाखो प्रवासी मुंबईच्या दिशेने प्रवास करत असतात. लोकलमधील वाढत्या गर्दीमुळे सकाळ, सायंकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवासी तारेवरची कसरत करत घर अथवा ऑफिस गाठतात. वाढत्या गर्दीमुळे रेल्वे स्टेशनवर होणा-या अपघातांच्या संख्येत वाढ हाेऊ लागली आहे. काही अपघातांमध्ये प्रवाशांचा गर्दीमुळे जीव गेल्याचे समाेर आले आहे.

त्यामुळे प्रवासी जीव मुठीत धरुन रेल्वे प्रवास करताहेत. गेल्या अनेक वर्षांपासून लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचे मागणी प्रवासी करीत आहे. यामध्ये 15 डब्यांची लोकल सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. परंतु कागदी घोडे नाचवण्यापलीकडे रेल्वे प्रशासन काहीच कारवाई करत नसल्याची खंत प्रवाशांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली.

काही प्रवाशांनी तर सकाळी घरातून निघाल्यानंतर सायंकाळी घरी परतु की नाही याबाबत देखील शाश्वती नसल्याचे सांगितले. दिव्यांग प्रवाशांनी लोकलमध्ये आमच्यासाठी एक डबा आरक्षित असताना त्या डब्यात देखील इतर प्रवासी चढतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे काही दिव्यांग प्रवाशांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO: Uddhav Thackeray यांनी रडणं सोडावं, ठाकरेंच्या 'त्या' टीकेवर शिंदेंचा जोरदार पलटवार

Kolhapur News : विजेच्या धक्क्याने पोटच्या दोन्ही मुलांचा मृत्यू; ५ दिवस पाण्याचा थेंबही घेतला नाही...मुलांच्या विरहाने माऊलीनेही सोडले प्राण

VIDEO: 'सत्तेची मस्ती असेल तर सत्तेत जाऊ देणार नाही', जरांगेंचा सरकारला इशारा

Kiara Advani : कियाराच्या सौंदर्यापुढे मोतीही फिके

VIDEO: Navi Mumbai आणि Panvel मध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे जनजीवन विस्कळीत

SCROLL FOR NEXT