Pet Dog Attacks In Pune Spark Demand For Stricter Rules And Owner Accountability saam tv
मुंबई/पुणे

आता पाळीव कुत्र्यांचीही दहशत; पाळीव कुत्र्यांसाठीही नियमावलीची गरज

Rules For Pet Dog: पुण्यातील पार्वती परिसरात पाळीव कुत्र्याने केलेल्या हल्ल्यामुळे सार्वजनिक सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. अनेक घटनांनंतर नागरिक आता अधिक कठोर नियम आणि पाळीव प्राण्यांच्या मालकांना जबाबदार धरण्याची मागणी करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • पुण्यातील पर्वती परिसरात एका पाळीव कुत्र्याने अनेक नागरिकांना चावा घेतल्याची घटना

  • घटनेनंतर एका तरुणाने पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली

  • भटक्या कुत्र्यांनंतर आता पाळीव कुत्र्यांमुळेही नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण

राज्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असतानाच आता पाळीव कुत्र्यामुळेही नागरिकांमध्ये भीती पसरलीय. अशा एका पाळीव कुत्र्यानं हैदोस घातलाय. यामुळे मात्र मालकाला जेलची हवा खावी लागू शकते. कुठला आहे हा पाळीव कुत्रा? आणि नेमका किती जणांवर या कुत्र्यानं हल्ला केलाय? पाहूयात हा रिपोर्ट.

विविध शहरांत सध्या भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिक दहशतीत आहेत. त्यात आता पाळीव कुत्र्यांचीही दहशत वाढत चाललीय. पुण्याच्या पर्वती परिसरात एका पाळीव कुत्र्यानं हल्ला करत अनेक नागरिकांना चावा घेतल्याचं समोर आलंय. या प्रकरणी एका 30 वर्षीय तरुणानं थेट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवलीये.

क्षीरसागर कुटुंबानं गेल्या सहा वर्षांपासून 'शराबी' नावाचं पांढऱ्या रंगाचं कुत्रं पाळलंय. हे कुत्रं परिसरातील रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांवर हल्ला करून त्यांना चावत असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या. रहिवाशांनी अनेकदा संबंधित कुटुंबीयांना कुत्र्यावर नियंत्रण ठेवण्याची विनंती केली. मात्र, क्षीरसागर कुटुंबानं याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. या कुत्र्याने आतापर्यंत 10 ते 12 जणांना चावा घेतल्याचा दावा तक्रारदाराने केलाय.

विशेष म्हणजे, पाळीव कुत्र्यामुळे नागरिकांना दुखापती होत असतानाही आवश्यक खबरदारी न घेतल्याप्रकरणी क्षीरसागर कुटुंबाविरोधात पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पाळीव प्राणी पाळणं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही, याची जबाबदारी मालकाचीच असते. नुकतंच सर्वोच्च न्यायालयानं भटक्या कुत्र्यांसंदर्भात देशातील सर्व राज्य सरकारांना महत्त्वाचे निर्देश दिलेत. मात्र, असं असताना आता पाळीव कुत्र्यावरून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर याबाबत कडक नियमावली तयारी करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT