Mumbai Local Saam TV
मुंबई/पुणे

टिटवाळा स्थानकात प्रवाशांचा संयम तुटला, लोकल लेट धावत असल्याने ट्रॅकवर उतरत केला रेल रोको

मुंबईहून येणारी प्रत्येक लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांचा उद्रेक झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाणे : लोकल ट्रेन उशीरा धावत असल्याने टिटावाळा रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी रेल रोको केला. लोकल उशीरा धावत असल्याने रेल्वे प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरुन आंदोलन केलं. मुंबईच्या दिशेने जाणारी प्रत्येक लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांचा उद्रेक झाला आहे. (Latest Marathi News)

कसारा-सीएसएमटी लोकल (Mumbai Local) जी टिटवाळा स्थानकात ८.१९ वाजताची आहे, ही लोकल रोजच उशीरा येत असते. यामुळे प्रवाशांना आपल्या ऑफिसमध्ये पोहोचण्यास उशीर होतो. तसेच लोकल उशीरा असल्याने रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दीही वाढते. या रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर आज प्रवासी आक्रमक झाले.

आज देखील ही लोकल उशारा असल्याने प्रवाशांनी थेट रेल्वे ट्रॅकवर उतरण्याचा निर्णय घेतला. जवळपास 15 मिनिटे प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत प्रवाशांना रेल्वे मार्गावरुन हटवले. त्यानंतर लोकल सीएसएमटीच्या दिशेने रवाना झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Horoscope : स्वामींच्या कृपेने ५ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार, गुरूवार तुमच्यासाठी कसा असेल?

Beed Crime: मुलीला का मारले? जाब विचारताच ५० वर्षीय महिलेच्या डोक्यात घातली वीट

Maharashtra News Live Update: आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात वरुणराजाचा जलाभिषेक; वारकऱ्यांची एकच धावपळ

Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा सरकरचा नेमका प्लान काय?

Samarth Movie: समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची आधुनिक काळाशी सांगड; 'समर्थ' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT