VIDEO: छेडछाडीच्या भीतीने मुलीने धावत्या रिक्षातून मारली उडी, अन्...'; औरंगाबादमधील धक्कादायक घटना

औरंगाबाद शहरातील क्रांती चौक परिसरात रिक्षा चालकाने रिक्षात बसलेल्या एका मुलीची छेड काढल्याने अल्पवयीन मुलीनं रिक्षातून उडी मारल्याची घटना घडली आहे.
aurangabad crime news
aurangabad crime newssaam tv

Aurangabad Crime News : औरंगाबाद शहरातील क्रांती चौक परिसरात रिक्षा चालकाने रिक्षात बसलेल्या एका मुलीची छेड काढल्याने अल्पवयीन मुलीनं रिक्षातून उडी मारल्याची घटना घडली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे. (Latest Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, छेड काढत असल्यानं भरधाव वेगाने जाणाऱ्या रिक्षातून मुलीने उडी टाकल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या व्हिडिओ पाहून थरकाप उडाला आहे. काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद शहरात एक महिला धावता रिक्षातून उडी मारली होती. त्यानंतर आता पुन्हा तोच प्रकार घडला आहे.

मंगळवारी क्लासेस संपल्यानंतर घरी जाताना रिक्षात बसलेल्या अल्पवयीन मुलीची रिक्षा (Rickshaw) चालकाने तिची छेड काढली. यामुळे भीतीने अल्पवयीन मुलीने चालत्या रिक्षातून उडी मारली. यामुळे तिच्या डोक्याला जखम झाली. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याप्रमाणे रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

aurangabad crime news
Crime : धुळ्यात पोलीस निरीक्षकानं उचललं टोकाचं पाऊल; घटनेने शहरात खळबळ

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासातच क्रांती चौक पोलिसांनी नराधम रिक्षाचालकाला ताब्यात घेतले आहे. सय्यद अकबर सय्यद हमीद असे या रिक्षा चालकाचे नाव आहे. बाहेरगाहून शिक्षणासाठी आलेल्या आणि घरातून बाहेर पडलेल्या मुलींना औरंगाबाद (Aurangabad) शहरात अशाच छेडछाडीला सामोरे जावे लागत आहे. या प्रकारामुले सार्वजनिक ठिकाणी जायचं की नाही आणि रिक्षा,बसमधून प्रवास करायचा की नाही ? असा प्रश्न महिला आणि मुलींना पडला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com