महेंद्र वानखेडे, साम प्रतिनिधी
लोकलचा प्रवास अनेकदा जोखमीचे ठरते. लोकलमधून प्रवास करताना अनेक अपघात देखील घडतात. लोकल पकडताना अचानक आपला हात सुटतो आणि रेल्वे रूळावर पडण्याची शक्यता असते. अशावेळी सतर्कता दाखवून आरपीएफ जवान अनुचित प्रकार घडू नये म्हणून धाव घेतात आणि रक्षण करतात. मात्र, वसईमध्ये विचित्र प्रकार पाहायला मिळाला आहे. एका प्रवाशाने आरपीएफ जवानाचा चावा घेतला असून, चावा घेणार्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
डहाणू लोकलमध्ये एका प्रवाशाला दिव्यांग डब्यामध्ये प्रवास का करतो? असा प्रश्न आरपीएफ जवानाने विचारले असता, एका व्यक्तीने धक्काबुक्की करून चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
नेमकं घडलं काय?
डहाणू लोकल सकाळी १०च्या सुमारास वसई रेल्वे स्थानकावर पोहोचली. यावेळी आरपीएफ जवानांची एक टीम स्थानकावर तैनात होती. दिव्यांगाच्या डब्यात एक प्रवासी बसला होता. त्याला आरपीएफ जवानांनी खाली उतरण्यास सांगितले. मात्र, त्या व्यक्तीने आरपीएफ जवानाचे ऐकले नाही. तो आरपीएफ जवानाशी हुज्जत घालू लागला.
हुज्जत घालत असताना, आरपीएफ जवान थेट लोकल डब्यात चढला. नंतर आरपीएफ जवानाने त्यांना खाली उतरायला सांगितले. दिव्यांग कक्ष असूनही सामान्य व्यक्तीने प्रवास करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, तरीही तो व्यक्ती दिव्यांग डब्यात प्रवास करत होता. आरपीएफ जवानाने त्याला खाली उतरवले, परंतू त्यानंतर तो आरपीएफ जवानाला धक्का बुक्की करू लागला.
आरपीएफ जवानाला धक्काबुक्की केल्यानंतर त्याने जोरदार चावा घेतला. हा विचित्र प्रकार घडल्यानंतर त्याला तातडीने पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या प्रकरणी तो व्यक्ती नेमका कुठला? याचा तपास सुरू आहे. मात्र, कर्तव्यावर असतानाच रक्षकालाच असा चावा घेतल्याने परिसरात खळबळ उडाली असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.