parner police arrests youth for hitting corporator yuvraj pathare  Saam Digital
मुंबई/पुणे

Crime News : धक्कादायक ! नगरसेवकावर दिवसाढवळ्या गोळीबाराचा प्रयत्न, एकास पाेलिसांनी घेतलं ताब्यात

Ahmednagar Crime News : या घटनेनंतर नगरसेवक युवराज पठारेंनी व अन्य काही जणांनी संबंधितास पकडले. पोलिसांनी संबंधितास ताब्यात घेतले आहे.

Siddharth Latkar

- सुशिल थाेरात

Parner News :

पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक युवराज पठारे (corporator yuvraj pathare) यांच्यावर आज (गुरुवार) गावठी कट्ट्याने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न झाला. या घटनेत पठारे बचावल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली. पारनेर शहरातील एका हॉटेल नजीक हा प्रकार घडला. या घटनेनंतर पाेलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार ही घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला मात्र गावठी कट्ट्यातून गोळी झाडता न आल्यामुळे त्यांच्यावरील संकट टळले.

या घटनेनंतर पठारेंनी व अन्य काही जणांनी संबंधितास पकडले. पोलिसांनी संबंधितास ताब्यात घेतले आहे. संशयित हा अल्पवयीन आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. त्याने पठारे यांच्यावर का हल्ला केला याचे कारण अद्याप स्पष्ट समजू शकलेले नाही अशी माहिती पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT