panvel Crime Saam Tv News
मुंबई/पुणे

Panvel Crime News: ब्रेकअप झालं, प्रेयसी दुसऱ्याशी बोलत असल्याचा संशय, प्रियकरानं थेट प्रेयसीलाच संपवलं

Navi Mumbai Crime News: प्रेम प्रकरणातून तरूणीच्या घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना नवीन पनवेलमध्ये घडली असून प्रियकर आरोपीनं तरूणीच्या गळ्यावर चाकूने वार करत तिची हत्या केली आहे.

Bhagyashree Kamble

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही

प्रेम प्रकरणातून तरूणीच्या घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना नवीन पनवेलमध्ये घडली असून प्रियकर आरोपीनं तरूणीच्या गळ्यावर चाकूने वार करत तिची हत्या केली आहे. या घटनेत २२ वर्षीय तरूणीचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नवीन पनवेल येथे प्रेम प्रकरणातून एका तरूणीची हत्या करण्यात आली आहे. तरूणीच्या प्रियकराने गळ्यावर चाकूने सपासप वार केले. ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रियकर निकेश शिंदे असे आरोपीचे नाव आहे. तरूणी आणि आरोपी निकेश शिंदे यांच्यामध्ये प्रेम संबंध होते. ३ महिन्यांपूर्वी त्यांचा काही कारणास्तव ब्रेकअप झाला होता.

ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याचा संशय प्रियकराला होता. प्रियकराच्या मनामध्ये संशयानं घर तयार केलं होतं. याच संशयाच्या रागातून निकेशनं थेट प्रेयसीचे घर गाठलं. नवीन पनवेल येथील प्रेयसीच्या राहत्या घरी जाऊन शिवीगाळ आणि मारहाण केली. नंतर राग अनावर झाल्यानंतर निकेशने थेट चाकूने गळ्यावर वार करत प्रेयसीची हत्या केली.

प्रेयसीच्या गळ्यावर वार केल्यानंतर निकेशने आपल्या गळ्यावर देखील वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर निकेशला थेट रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खान्देश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local body Election : झेडपी, नगर पंचायतीच्या निवडणुका लांबणार? आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार

Maharashtra Live News Update: येत्या ५ तारखेला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता

UPSC Success Story: ८ वेळा अपयश, नवव्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; स्वच्छता कर्मचाऱ्याचा लेक झाला सरकारी अधिकारी

Local Body Election : ताई की दादा, लाडकी बहीण कोणाची? लाडकीवरुन महायुतीतच लढाई

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT