NMMT Bus Accident Panvel Saam Tv
मुंबई/पुणे

Panvel Accident : पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात बसचा ब्रेक फेल, चालकामुळे मोठी दुर्घटना टळली, थरराक व्हिडिओ

NMMT Bus Accident Panvel: पनवेल रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी एनएमएमटी बसचा ब्रेक फेल झाल्याची घटना घडली. प्रसंगावधान दाखवून चालकाने बस थेट भिंतीवर आदळवली आणि मोठी दुर्घटना टळली.

Alisha Khedekar

  • पनवेल स्थानकाजवळ एनएमएमटी बसचा ब्रेक फेल झाला.

  • चालकाने प्रसंगावधान दाखवत बस भिंतीवर आदळवली.

  • मोठी दुर्घटना टळली, शेकडो प्रवासी बचावले.

  • एनएमएमटी प्रशासनाने चौकशी सुरू केली असून प्रवासी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

पनवेल रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी भीषण अपघाताची घटना घडली. एनएमएमटीची ७३ नंबर बस (क्रमांक MH 43 – H – 5334) कल्याण येथून पनवेलकडे येत असताना अचानक तिचा ब्रेक फेल झाला. या प्रसंगात चालकाने वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एनएमएमटीची ७३ नंबर बस कल्याण येथून पनवेलकडे येत असताना स्थानक परिसरात बस पोहचली. मात्र पुन्हा निघत असतानाच अचानक ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने तातडीने बसचे स्टेअरिंग बाजूला वळवून ती थेट रेल्वे स्थानकाच्या संरक्षण भिंतीवर आदळवली. जोरदार धडकेत भिंतीचे आणि बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असले तरी प्रवाशांचे प्राण वाचले.

समोरच बस थांब्याजवळ प्रवासी उभे होते, तसेच रिक्षा स्थानकाजवळ देखील मोठी गर्दी होती. चालकाने धोक्याची जाणीव होताच बस त्या दिशेला न नेता भिंतीवर आदळवली. अन्यथा बस थेट थांब्यावर किंवा रिक्षा स्थानकावर धडकली असती आणि अनेकांचे जीव धोक्यात आले असते.

या अपघातात मोठ्या प्रमाणावर दगड-मलबा रस्त्यावर पडला. काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सुदैवाने गंभीर दुखापत अथवा मृत्यू झाल्याची माहिती मिळालेली नाही. पनवेल हा रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. येथे दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे अशा दुर्घटनांचा परिणाम मोठ्या संख्येने लोकांवर होऊ शकतो. या अपघातामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी चालकाच्या तातडीच्या निर्णयामुळे शेकडो लोकांचा जीव वाचला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : बसची जोरदार धडक, प्रवासी वृद्धाचा मृत्यू; यवतमाळच्या दारव्हा बसस्थानक आवारातील घटना

Pimple Warning : मुरुम काढण्याच्या निष्काळजीपणाने थेट मेंदूला धोका, या सामान्य समस्येला दुर्लक्षित करु नका

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण आंदोलनानंतर शेतकरी कर्जमाफीचं आंदोलनही मुंबई धडकणार

पुणे - नाशिक प्रवास होणार जलद; २ तासांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांवर, कुठून कसा असणार एलिव्हेटेड मार्ग?

Vande Bharat: नांदेड- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरू, थांबा- तिकीट अन् वेळापत्रक काय? वाचा सर्वकाही

SCROLL FOR NEXT