Panvel-Karjat Suburban Railway Line Saam Digital
मुंबई/पुणे

Panvel-Karjat Suburban Railway Line : पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गावर लवकरच धावणार ट्रेन; काय आहे स्थिती? जाणून घ्या

Panvel-Karjat Suburban Railway Line : पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पातील सर्वात मोठा वावर्ले बोगदा खोदण्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून नढाळ आणि किरावली बोगदा खणण्याचे कामही सुरू आहे.

Sandeep Gawade

Panvel-Karjat Suburban Railway Line

पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पातील सर्वात मोठा वावर्ले बोगदा खोदण्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून नढाळ आणि किरावली बोगदा खणण्याचे कामही सुरू आहे. सुमारे तीन हजार १४४ मीटर लांबीच्या तिन्ही बोगद्यांचे ८० टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्णत्वास गेल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने दिली आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी ३) अंतर्गत पनवेल ते कर्जत दुहेरी रेल्वे मार्गिका उभारण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गाकरिता २ हजार ७८२ कोटी रुपये खर्च येणार असून या मार्गाची लांबी ३० किमी आहे. २०२४-२५ च्या अंतरिम अर्थसंकल्पात या प्रकल्पाकरिता ३०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या मार्गामुळे प्रवास वेळेत ३० मिनिटांची बचत होणार आहे. पनवेल-कर्जत या नव्या २९.६ किमीच्या दुहेरी रेल्वे मार्गावर पनवेल, चौक, मोहापे, चिखले, कर्जत अशी पाच स्थानके आहेत. ३.१२ किमीचे तीन रेल्वे बोगदे आहेत. तसेच या रेल्वेमार्गावर दोन रेल्वे उड्डाणपूल, आठ मोठे पूल आणि ३६ लहान पूल असणार आहेत.

रेल्वे बोगद्याची कामाची स्थिती

या रेल्वे मार्गावर नढाळ, किरवली आणि वावर्ले असे तीन बोगदे उभारण्यात येणार आहेत. यापैकी वावर्ले बोगदा हा २६२५ मीटर लांबीचा आहे. आतापर्यंत २६२५ मीटरपैकी २,४२५ मीटर जमिनीखाली उत्खनन पूर्ण झाले आहे; तर नढाळ बोगद्याची लांबी २१९ मीटर असून आतापर्यंत जमिनीखाली उत्खनन पूर्ण झाले. पाणीगळती रोखण्याचे काम सुरू आहे. किरवली बोगदा ३२० मीटर लांबीचा असून जमिनीखाली उत्खनन पूर्ण झाले. सुमारे तीन हजार १४४ मीटर लांबीच्या तिन्ही बोगद्यांचे ८० टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्णत्वास गेल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT