Sanjay Nirupam: मोठी बातमी! संजय निरुपम यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी

Congress News: एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. के सी वेणुगोपाल यांनी पत्राद्वारे याची माहिती दिली आहे.
Sanjay Nirupam
Sanjay NirupamSaam Tv

Sanjay Nirupam News:

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. के सी वेणुगोपाल यांनी पत्राद्वारे याची माहिती दिली आहे. निरुपम यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी होत असल्याचं के सी वेणुगोपाल यांनी आपल्या पत्रातून सांगितलं आहे.

आजच राज्यातील पक्षाच्या कार्यकारिणीने त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी शिफारस केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sanjay Nirupam
Sanjay Singh: 'ही वेळ संघर्षाची आहे, उत्सवाची नाही', तिहारमधून बाहेर पडताच संजय सिंह यांचं पहिलं वक्तव्य

संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी करतानाच के सी वेणुगोपाल यांनी पत्रात म्हटलं आहे की, ''अनुशासनहीन आणि पक्षविरोधी वक्तव्याच्या तक्रारींची दखल घेत काँग्रेस अध्यक्षांनी संजय निरुपम यांची पक्षातून सहा वर्षांसाठी तत्काळ प्रभावाने हकालपट्टी करण्यास मान्यता दिली आहे.''  (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाकडून उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर त्यांचे अनेक वक्तव्य देखील समोर आले. यानंतर पक्षाने स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांचं नाव कमी केलं होतं.

Sanjay Nirupam
Heatwave Warning: देशभरात वाढला तापमानाचा पारा, केंद्र सरकारची राज्यांना अ‍ॅडव्हायझरी; दिल्या महत्त्वाच्या सूचना

याआधी त्यांनी भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांची भेटही घेतली होती. यानंतर संजय निरुपम भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरु झाली होती. यातच काँग्रेसने त्यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे. दरम्यान, मुंबईत जागावाटपाच्या मुद्द्यावरून मिलिंद देवरा यांनी आधीच काँग्रेसची साथ सोडली आहे आणि आता संजय निरुपम यांना काँग्रेसने पक्षातून बाहेरचा रास्ता दाखवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com