Severely damaged car and tempo after a fatal collision on the Pali-Khopoli state highway near Pedali village. Saam Tv
मुंबई/पुणे

पहाटे अपघात! चालकाला झोप लागली अन् कार-टेम्पोची जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

Deadly Collision On Pali-Khopoli Highway: पाली-खोपोली राज्य महामार्गावर पेडली गावाजवळ कार आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Omkar Sonawane

अमित गवळे, प्रतिनिधि

रायगड: पाली-खोपोली राज्य महामार्गावर पेडली गावाच्या हद्दीत सोमवारी (ता. 18) पहाटे 6 वाजताच्या सुमारास भीषण रस्ता अपघात झाला. कार आणि टेम्पो यांच्यात झालेल्या या जोरदार धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कारमधील प्रवासी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून मुंबईच्या दिशेने जात होते. कार पेडली परिसरात आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारने समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोला जोरदार धडक दिली. कार चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामध्ये मृत व्यक्ती रोहन साळुंखे (रा. खेड, जि. रत्नागिरी), तर जखमींमध्ये प्रकाश हजारे (रा. शहापूर, ठाणे) आणि अविनाश पडवळ (रा. टिटवाळा). हे दोघेही गंभीर जखमी आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक मदत यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. धडक इतकी भीषण होती की जखमी कारमध्येच अडकले होते. त्यांना कटरच्या साहाय्याने कारचे दरवाजे तोडून बाहेर काढण्यात आले. जखमींवर सध्या एमजीएम हॉस्पिटल (कामोठे, पनवेल) येथे उपचार सुरू आहेत. मृत रोहन साळुंखे यांचे शव जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT