Palgha ZP  Saam TV
मुंबई/पुणे

Palghar ZP : ठाकरे गटाला दणका, शिंदे गटाला मिळाला महाराष्ट्रात पहिला जिल्हा परिषद अध्यक्ष

शिवसेनेचे 20 पैकी 20 सदस्य बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात दाखल झाल्याने हे सत्तांतर शक्य झालं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पालघर : पालघर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पालघर जिल्हा परिषदेत सत्ता परिवर्तन झालं असून महाविकास आघाडीला पायउतार करत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप सत्तेत आले आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रकाश निकम यांची अध्यक्ष म्हणून तर भाजपचे पंकज कोरे यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. शिंदे गटाला (Eknath Shinde)  महाराष्ट्रात पहिला जिल्हा परिषद अध्यक्ष मिळाला आहे.

शिवसेनेचे 20 पैकी 20 सदस्य बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात दाखल झाल्याने हे सत्तांतर शक्य झालं आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज पार पडली. पालघर जिल्हा परिषद महाविकास आघाडीच्या हाती असली तरी शिवसेनेतील 20 पैकी 20 ही जिल्हा परिषद सदस्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला होता. (Latest Marathi News)

पालघर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 57 असून 29 हा बहुमताचा आकडा आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्र आल्याने हा आकडा पूर्ण झाला आहे.

जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल

  • शिवसेना - 20

  • भाजप - 13

  • राष्ट्रवादी - 13

  • माकप - 6

  • बविआ - 5

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kajal Aggarwal : काजल अग्रवालच्या मृत्यूची अफवा, नेमकं काय आहे सत्य?

Zilha Parishad School : बंद पडणाऱ्या जिल्हा परिषद शाळेचा कायापालट; शिक्षक दाम्पत्याच्या योगदानाला लोकसहभागाची साथ

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेचे ₹२००० जमा, तुमच्या खात्यात पैसे आले का? असं करा चेक

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये?

SCROLL FOR NEXT