Pune : सिंहगड किल्ल्यावर जाण्याआधी वन विभागाचा निर्णय जाणून घ्या, अन्यथा भरावा लागेल दंड

गडाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी वन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.
Pune News
Pune NewsSaam Tv
Published On

सचिन जाधव

Pune News : वन विभागाचे अधिकारी, वनसंरक्षण समिती आणि घेरा समितीतील गावांतील सरपंचांच्या उपस्थितीत मंगळवारी सिंहगडावर (Sinhagad Fort) बैठक घेण्यात आली. स्टॉलची जागा, खाद्यपदार्थांची विक्री, प्लास्टिक कचऱ्याबद्दल या वेळी चर्चा करण्यात आली. वन परिमंडल अधिकारी बाळासाहेब लटके, वनरक्षक बाळासाहेब जिवडे, वन संरक्षण समितीचे माजी अध्यक्ष दत्ता जोरकर, इतर पदाधिकारी आणि घेरा सिंहगडमधील गावांचे सरपंच उपस्थित होते.

Pune News
Local Crime Branch : एलसीबीची माेठी कारवाई; तलवारी, गुप्त्या, चाकूंसह एक अटकेत

गडाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी वन विभागाने (Forest Department) मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सिंहगड किल्ल्यावर आता वेफर आणि नूडल्सवर बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांच्या मागणीवरून सिंहगड किल्ल्यावर नूडल्स आणि वेफर्स यासारख्या खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती. सध्या गडावर ११०पेक्षा जास्त टपऱ्या आहेत. तसेच अनेक पर्यटक खाद्यपदार्थांची पाकिटे गडावरच फेकत असल्याने प्लास्टिक कचऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.

त्यामुळे वन विभागाने सिंहगड किल्ल्यावर प्लास्टिक वेस्टण असलेल्या खाद्यपदार्थांची विक्री बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विक्रेत्यांनी गडावर जाताना केवळ दुधाची पिशवी, प्लास्टिकच्या बाटल्या घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय प्लास्टिक पिशव्या घेऊन येणाऱ्या पर्यटकांना दंड भरावा लागणार आहे. वनविभागाने वनसंरक्षण समिती, स्थानिक हाॅटेल व्यावसायिक व ग्रामस्थ यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com