gondia, arrests, lcb, punjab
gondia, arrests, lcb, punjabSaam Tv

Local Crime Branch : एलसीबीची माेठी कारवाई; तलवारी, गुप्त्या, चाकूंसह एक अटकेत

त्याच्याकडे घातक शस्त्र बाळगण्याचे कसलेही कागदपत्र अथवा विक्रीचा परवाना नव्हता.
Published on

Gondia Crime News : धारदार घातक शस्त्रे गोंदियात (gondia) विक्रीसाठी आणलेल्या पंजाबमधील (punjab) एकाला गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या (local crime branch) पोलिसांनी अटक केली. चमकोरसिंग स्वर्णसिंग सिंग असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून पंधरा तलवारी, सात गुप्त्या तसेच सात चाकू जप्त करण्यात आले आहेत.

गोंदिया एसपींनी गोंदिया जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी असे निर्देश स्थानिक गुन्हे करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला. (Maharashtra News)

gondia, arrests, lcb, punjab
Zilla Parishad News : जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागतील शाखा अभियंता लाच घेताना सापडला; गुन्हा दाखल

पोलिस (police) हवालदार राजू मिश्रा यांना निर्मल स्कूलजवळ रेलटोली, गोंदिया येथे एक व्यक्ती बेकायदेशीररीत्या अवैध शस्त्रे बाळगून विकत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने (lcb) धाड टाकली असता चमकोरसिंग स्वर्णसिंग सिंग (54. रा.क्लेजर उत्तर, जिल्हा तामतरन, पंजाब) याने लावलेल्या दुकानातील टेबलाच्या खाली एका पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पोत्यात (15 तलवारी 7 गुप्त्या 7 चाकू) हत्यारे मिळाली.

gondia, arrests, lcb, punjab
Pune Crime : कोयत्याने वार करुन काेंढव्यातील नामचिन गुंडाला संपवलं; पाेलिस तपास सुरु

त्याच्याकडे घातक शस्त्र बाळगण्याचे कसलेही कागदपत्र अथवा विक्रीचा परवाना नव्हता. जिल्हाधिकारी यांच्या अधिसूचनेतील अटींचे उल्लंघन केल्याने त्याच्या विराेधात अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा (कलम 4,25 अन्वये) मुंबई पोलिस कायदा (सन 1991कलम 135 शिक्षा कलाम 37 (1) (3) चे) उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. (Tajya Batmya)

Edited By : Siddharth Latkar

gondia, arrests, lcb, punjab
Bhima Sahakari Sakhar Karkhana Election Final Result : 'भीमा' त पुन्हा 'मुन्नाराज'; जाणून घ्या सर्व निकाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com