Manasvi Choudhary
दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नवरा - बायकोच्या प्रेमाचा खास दिवस आहे.
दिवाळी पाडवानिमित्त पतीसाठी गोड पदार्थाचे नैवेद्य केले जाते. तुम्ही ही घरच्या घरी स्पेशल रवा खीर बनवू शकता.
रवी खीरसाठी बारीक रवा, साखर, दूध, तूप, वेलची पूड, जायफळ पूड, केशर, ड्रायफ्रूट्स हे साहित्य घ्या.
रवा खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर एका भांड्यात दूध उकळून घ्या.
उकळलेले घट्टसर दूधामध्ये साखर मिक्स करा. साखर चांगली विरघळून द्या.
गॅसवर दुसऱ्या बाजूला कढईमध्ये तूप गरम करून त्यात रवा सोनेरी होईपर्यत भाजून घ्या.
रवा भाजला की त्यात पाणी घाला आणि ५ मिनिटे शिजवून घ्या. रवा चांगला फुलला की त्यात उकळलेले दूध मिक्स करा.
रवा खीरमध्ये वेलची पूड, जायफळ पूड आणि केशर घाला आणि खीरला उकळून घ्या. अशाप्रकारे तयार खीरमध्ये शेवटी ड्रायफ्रुट्स मिक्स करा.