Dhanshri Shintre
कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटीजवळील भुदरगड किल्ला त्याच्या मजबूत तटबंदीसाठी, ऐतिहासिक महत्त्वासाठी आणि निसर्गरम्य सौंदर्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे, पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
भुदरगड किल्ला एका मोठ्या बेसाल्ट खडकावर उभा आहे. त्याची तटबंदी अद्याप टिकलेली असून, जांभ्या दगडाने दुरुस्त केलेली दिसते.
सुमारे १८० एकर क्षेत्रफळ व्यापणारा भुदरगड किल्ला पठारावरील मोठ्या आणि ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
किल्ल्याच्या तटबंदीसाठी चिरा काढल्यामुळे १४ हेक्टर क्षेत्रात तलाव निर्माण झाले आहेत. 'दुधसागर तलावा' त्याच्या पांढऱ्या दुधासारख्या रंगामुळे किल्ल्याला अधिक सुंदर बनवतो.
भुदरगड किल्ला शिलाहार राजा भोज (दुसरा) यांनी बांधल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व अधिक अधोरेखित होते.
सन् १६६७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी भुदरगड किल्ला आदिलशाहीच्या ताब्यातून मुक्त करून ताब्यात घेतला होता.
किल्ल्यावर भैरवनाथाचे मंदिर असल्यामुळे येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भक्तांची यात्रा भरते आणि धार्मिक वातावरण तयार होते.
कोल्हापूरहून गारगोटीपर्यंत बसने जा, नंतर पाली गावातून खाजगी वाहनाने ५ किमी अंतर पार करून किल्ल्यापर्यंत पोहोचता येते.