Boat sank in Palghar Dahanu sea Saam TV
मुंबई/पुणे

Palghar Breaking News: डहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टर मार्फत शोधमोहिम सुरू

Dahanu Breaking News: समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटीला दुर्घटना होऊन बोट बुडाल्याची घटना डहाणूच्या समुद्रात घडली.

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

Boat sank in Palghar Dahanu sea: पालघर जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटीला दुर्घटना होऊन बोट बुडाल्याची घटना डहाणूच्या समुद्रात घडली. या बोटीतील दोन तरुणांपैकी एकाला वाचवण्यात यश आलं आहे. तर एक तरुण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती आहे. कोस्टगार्डकडून या तरुणाचा शोध घेतला जात आहे.

भूपेंद्र अंभिरे असं बेपत्ता तरुणाचं नाव असून त्याच्यासोबत असलेला संजय पाटील हा तरुण समुद्रकिनाऱ्यावर पोहचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1 जून ते 31 जुलै हा 61 दिवसांचा कालावधी मासेमारीसाठी बंदी असताना देखील डहाणूतील दोन तरुण छोटी बोट घेऊन समुद्रात मासेमारीसाठी गेले होते.

समुद्रात अचानक काही अंतरावर गेल्यावर ही बोट दुर्घटनाग्रस्त झाली. या बोटीवर असलेल्या दोन तरुणांपैकी संजय पाटील हा तरुण समुद्रकिनाऱ्यावर पोहत समुद्रकिनाऱ्यावर पोहचला. तर भूपेंद्र अंभिरे हा तरुण अद्यापही बेपत्ता आहे. सध्या कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरमार्फत त्याचा शोध घेतला जात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fort : किल्ला, समुद्र अन् हजारो फ्लेमिंगो; मुंबईतील 'या' ठिकाणाचं सौंदर्य मन मोहून टाकतं!

Diabetes Diet: डायबिटीजच्या रुग्णांसाठी 'ही' भाजी ठरू शकते फायदेशीर; ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी नक्की खा

Maharashtra News Live Update: धुळे सोलापूर महामार्गवर पुन्हा मराठा आंदोलकांनी रस्ता अडवला

सत्ताधारी पक्षातील नेत्याची भररस्त्यात हत्या; कार्यालयात जाताना सहा जणांच्या टोळीने घेरलं अन्...

विंचू आणि साप चावण्यात नेमका काय फरक? पावसाळ्यात या घटना का वाढतात, जाणून घ्या महत्त्वाची माहिती!

SCROLL FOR NEXT