मागील आठवडाभरापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
मुंबईसह ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.
जोरदार पावसामुळे मुंबई आणि ठाण्यातील तलाव ओसंडून वाहू लागले आहेत.
दरम्यान, हवामान खात्याने आज आणि उद्या मुंबईसह ठाण्यात उद्या मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान खात्याने मुंबईसह ठाण्याला गुरूवारी पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. यामुळे प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुणे, सातारा, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये देखील रेड अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाची पट्टा निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील ३ ते ४ तासांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.