palghar news  Saam tv
मुंबई/पुणे

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर हिट अँड रन; अज्ञात वाहनाने चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू

Mumbai-Ahmedabad accident update : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर हिट अँड रनची घटना घडली आहे. पालघरमध्ये अज्ञात वाहनाने चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

रुपेश पाटील

पालघरमध्ये हिट अँड रन अपघात

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तिघांचा अपघाती मृत्यू

अज्ञात वाहन चालक फरार झाला

पालघर : राज्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. पालघरमध्येही भीषण अपघाताची घटना घडली. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अज्ञात वाहनाने चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातानंतर महामार्गावर अनेकांची एकच धावाधाव झाली. यात तिघांच्या मृतदेहाचा चेंदामेंदा झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील ढेकाळे येथील वाघोबा खिंड परिसरात भीषण अपघाताची घटना घडली. अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. पंचनामा आणि पुढील कार्यवाही सुरू आहे.

अपघातामधील मृतांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे. मनोर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत ग्रामीण रुग्णालयात हलवले आहेत. अपघात करून फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

अपघातात मृतदेहाचा चेंदामेंदा

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अज्ञात वाहनाने तिघांना जोरदार धडक दिली. तिघांना चिरडल्यानंतर अज्ञात वाहनधारकांनी घटनास्थळावरून पळ काढला. यात तिघांच्या मृतदेहाचा चेंदामेंदा झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तिघांचे पोलिसांनी ताब्यात घेत रुग्णालयात पाठवले. तिघांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघाताची घटना कुठे घडली?

पालघरच्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाघोबा खिंड परिसरात ही घटना घडली.

अपघातातील मृतांची ओळख पटली आहे का?

पालघर अपघातामधील मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT