Palghar News Saam Tv
मुंबई/पुणे

Palghar : ठाकरे गटाला मोठा झटका; पालघर जिल्हाप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश

वसंत चव्हाण यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून बोईसर, विक्रमगड विधानसभा क्षेत्र आणि पालघर जिल्हाप्रमुखपदी पुनर्नियुक्ती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - पालघर (Palghar) जिल्हा परिषदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सदस्य आणि पालघर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी मुख्यमंत्री तथा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून वसंत चव्हाण यांची बोईसर आणि विक्रमगड विधानसभा क्षेत्र आणि पालघर जिल्हाप्रमुखपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला पालघर जिल्ह्यात मोठा फटका बसला आहे.

सुरुवातीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले शिलेदार आता हळूहळू बाळासाहेबांची शिवसेना पक्षात येऊन दाखल होऊ लागल्याने शिंदे यांच्या नेतृत्वाखालील संघटनेची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील आजी माजी शिवसेना पदाधिकारी आता हळूहळू शिंदे यांना समर्थन देऊन पक्षात प्रवेश करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे सदस्यही वसंत चव्हाण यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने शिंदे यांचही जिल्ह्यातील बळ अधिक वाढलं आहे.

या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी आमदार आणि पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे, माजी नगरसेवक राम रेपाळे आणि पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप देशातील सर्वात श्रीमंत पक्ष; जाणून घ्या कोणत्या पक्षाकडे किती आहे पैसा?

Death Facts: मृत्यूनंतरही 'हा' अवयव असतो जिवंत; जाणून आश्चर्य वाटेल

Maharashtra Live News Update: सुप्रिया सुळे यांच्यावर राष्ट्रवादीने दिली पुणे महापालिकेची जबाबदारी

Maharashtra Politics: मुंबईत दोस्ती तर पुण्यात कुस्ती; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून ठाकरे गटाने थोपटले दंड

Homemade Date Chutney: आंबटगोड खजूर चटणीची परफेक्ट रेसिपी, जाणून घ्या झटपट पटापट

SCROLL FOR NEXT