Mumbai Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : BMC अधिकारी असल्याचं सांगत करत होता भलतेच कारनामे; असा अडकला जाळ्यात

ओशिवरा पोलिसांची कारवाई

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Mumbai News : मुंबईच्या (Mumbai) अंधेरी पश्चिमेकडील उच्चभ्रूची वस्ती असलेल्या लोखंडवाला परिसरात बीएमसी अधिकारी असल्याचे सांगून घरात घुसून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस ओशिवरा पोलिसांनी (Police) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अक्षय असून आरोपीस ओशिवरा पोलिसांनी खार रेल्वे परिसरातून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोखंडवाला आयर्लंड पार्कमध्ये राहणाऱ्या जैन यांच्या घरात नूतनीकरणाचे काम सुरू होते. यादरम्यान ११ नोव्हेंबर रोजी अक्षय नावाच्या इसमाने बीएमसी के वेस्ट मेंटेनन्स विभागातून आल्याचं सांगून घरात प्रवेश केला व घरात सुरू असलेलं रिन्यूएशनचं काम हे बेकायदेशीर आहे असं सांगून या कामावर कारवाई टाळण्यासाठी दहा हजार रुपये मागितले.

मात्र फिर्यादीने ते देण्यास नकार दिला असता आरोपीने त्यांच्या गळ्यातील चैन ओढून पळण्याचा प्रयत्न केला. या संबंधीची तक्रार फिर्यादी यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये स्वतः येऊन दिली. तक्रार दाखल झाल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांनी तपासासाठी पथक बनवले.

गुप्त बातमीदाराकडुन तसेच सीसीटीव्ही फुटेज मधील प्राप्त माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेतला गुप्तहेराने दिलेल्या माहितीनुसार आरोपी खार रेल्वे परिसरात येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने सापळा रचून आरोपीला मोठ्या शिताफीने पकडण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

Maharashtra News Live Update : वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाचा जलसाठा पोहोचला 35 टक्क्यांवर

Highway tyre puncture: हायवेवर टायर पंक्चर झाल्यास काय कराल?

Oral Health Tips: रोज फक्त 2 मिनिटांचा हा उपाय ठरू शकतो दातांसाठी फायदेशीर; डॉक्टरांनी सांगितल्या तोंडाच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या सवयी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? ८ दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT