Ratnagiri News : राजापूर तालुक्यातील बारसु-सोलगाव रिफायनरीचा मुद्दा पुन्हा पेटणार

समर्थकांकडून रिफायनरीचे स्वागत तर विरोधक आपल्या भूमिकेवर ठाम
Rajapur Refinery
Rajapur RefinerySaam Tv
Published On

जितेश कोळी

Ratnagiri News : राजापूर तालुक्यातील बारसु-सोलगाव येथील प्रस्तावित रिफायनरीचा प्रकल्प हा नियोजित ठिकाणीच होणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केल्यानंतर आता स्थानिक पातळीवर मात्र रिफायनरीचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी रिफायनरीला जाहीर विरोध केला असतानाच आमदार राजन साळवी यांनी मात्र रिफायनरीला पाठींबा असल्याची घोषणा केली आहे. आमदार राजन साळवी यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्थानिक पातळीवर रिफायनरी समर्थकांनी स्वागत केले तर विरोधकांनी मात्र या निर्णयावर टीका केली आहे.

Rajapur Refinery
Nanded News: जेवणात निघाल्या अळ्या; संतप्त विद्यार्थी ताट घेवून पोहचले तहसिल कार्यालयात

राजापूर तालुक्यातील बारसु-सोलगाव येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल कोकणातील तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि कोकणचा विकास होईल या मुद्द्यावर राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी प्रकल्पाला समर्थन देत आपला पाठींबा जाहीर केला आहे. आमदार राजन साळवी यांच्या या निर्णयाचे रिफायनरी समर्थकांनी स्वागत केले असून रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातून परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या युवकांना आता कोकणातच रोजगार मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.

बारसु-सोलगाव रिफायनरीला राज्याच्या मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला असला तरी स्थानिक पातळीवर या प्रकल्पाला विरोध देखील मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना महामारीच्या काळात ग्रामपंचायतीच्या मासिक सभांमध्ये ग्रामस्थांची दिशाभूल करून रिफायनरी प्रकल्पाठी खोटे ठराव केले गेले.

आता त्याच ठरावांच्या आधारावर प्रस्तावित रिफायनरी नियोजित ठिकाणी उभारण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप रिफायनरी प्रकल्प विरोधकांनी केला आहे. रिफायनरीला समर्थन देणारे आमदार राजन साळवी यांच्यावर देखील विरोधकांनी टीका केली आहे. त्यामुळे कोकणात रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com