Kalyan News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News: कल्याणमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य, आमदार विश्वनाथ भोईर संतापले; आयुक्तांना इशारा देत म्हणाले...

KDMC News: कल्याण डोंबिवलीतील शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत. महापालिका प्रशासन पावसाचे कारण देत खड्डे भरण्यास टाळाटाळ करत असल्याचा, आरोप आता करण्यात येतोय.

Saam Tv

कल्याण डोंबिवलीतील शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत. महापालिका प्रशासन पावसाचे कारण देत खड्डे भरण्यास टाळाटाळ करत असल्याचा, आरोप आता करण्यात येतोय. महापालिकेचे अधिकाऱ्यांची बैठका घेऊन देखील खड्डे बुजवले जात नसल्याने शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी संताप व्यक्त केला आहे.

पावसाने उघडीप देऊन देखील महापालिकेने खड्डे भरलेले नाहीत. या खड्ड्यांमुळे अपघात घडू शकतात गणेशोत्सव जवळ आलाय. गणेश मूर्तींना धक्का लागू शकतो, खड्ड्यांमुळे कंटाळलेले नागरिक कोणतेही भूमिका घेऊ शकतात. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याची संपूर्ण जबाबदारी ही महापालिकाची असेल, असा इशाराच आमदार भोईर यांनी दिलाय.

कल्याण पश्चिमचे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आज काँक्रिटीकरणाच्या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन केलं. यावेळी आमदार भोईर यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, शहरातील खड्ड्यांबाबत अनेकदा महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. खड्डे भरण्याबाबत आयुक्तांना सूचना केल्या. खड्डे बुजवण्याची सातत्याने मागणी केली. मात्र महापालिकेकडून वारंवार पावसाची कारणं दिली जातात. आता पावसाने उघडीप दिल्यानंतर देखील खड्डे बुजवले गेले नाहीत. गणेशोत्सव काही दिवसांवर आलाय. या खड्ड्यांमुळे एखादा नागरिक, महिला लहान मुलं खड्ड्यात पडून अपघात होण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाप्पाचे आगमन देखील होतेय. गणेश मूर्ती नेताना मूर्तीला धक्का लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्सवाला गाल बोट लागू शकते. खड्ड्यांमुळे कंटाळलेल्या नागरिकांनी जर टोकाची भूमिका घेतली तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याची संपूर्ण जबाबदारी महापालिका आयुक्तांची असेल, असे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले. तसेच गणेशोत्सवापूर्वी जर खड्डे बुजवले नाही तर आम्हाला जे करायचे आहे, ते आम्ही करू, असा इशारा देखील त्यांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : 'बुलाती है मगर जाने का नहीं' पुरुषांना जाळ्यात ओढायच्या, कॅफेत नेऊन भलतंच करायच्या, मुंबईतील धक्कादायक प्रकार समोर

Maharashtra Live News Update : पुण्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला

कीर्तनकाराचं काळं कृत्य, पक्कडीने चटके देऊन अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार, अहिल्यानगर हादरले

Viral Video: जखमी व्यक्तीच्या डोक्यावर टाक्यांऐवजी स्टेप्लर पिन; व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ

Financial Year End: कामाची बातमी! १५ दिवसांत करा 'ही' ७ कामे; अन्यथा होईल आर्थिक नुकसान

SCROLL FOR NEXT