Mumbai Pune Highway x
मुंबई/पुणे

Mumbai–Pune Highway Accident : मित्रांसोबत लोणावळ्याला निघाला, पण वाटेत कुत्र्याने घात केला, मुंबई-पुणे हायवेवर तरूणाचा मृत्यू

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दुर्दैवी अपघात झाला. भटक्या कुत्र्याला वाचवताना कारचालकाने अचानक ब्रेक लावला आणि अपघात झाला. लोणावळ्याजवळ या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Namdeo Kumbhar

  • मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एका २० वर्षाच्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला.

  • भटक्या कुत्र्याला वाचवण्यासाठी चालकाने अचानक ब्रेक लावल्याने घात झाला.

  • या अपघातामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली

Mumbai Pune Expressway accident caused by stray dog : भटक्या कुत्र्यामुळे एका २० वर्षीय तरूणाचा अपघाती मृत्यू झालाय. जुन्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पनवेलजवळ वारवई गावाजवळ हा भीषण अपघात झालाय. यामध्ये वरळीतील २० वर्षाच्या कुशल मनोज सोनकर याचा हृदयद्रावक मृत्यू झालाय. कुशल अचानक रस्त्यावरून येणाऱ्या भटक्या कुत्र्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन् भीषण अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळीतील गोपाळनगर येथे राहणारा कुशल ७ मित्रांसह लोणावळ्याला फिरायला निघाला होता. यामध्ये पाच जण वरळीचे तर दोन जण डोंबिवलीचे होते. लोणावळ्याला जाण्याआधी पनवेलजवळील कळंबोलीमध्ये सर्वजण एकत्र जमले. सकाळी सात वाजताच्या सुमारास सर्वजण लोणावळ्याकडे निघाले होते. कुशल अतिशय वेगात दुचाकी चालवत होता. त्याचवेळी वारवई गावाजवळ अचानक कुत्रा समोर आला. कुत्र्यापासून वाचण्यासाठी कुशने अचानक ब्रेक लावला अन् दुचाकी जोरात घसरली आणि रस्त्याच्या कडेला जाऊन जोरात आदळली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मित्रांचे जबाब नोंदवले. कुशलच्या चुलत भावाने पोलिसांना सांगितले की, 'कुत्रा आढवा आल्यानंतर दुचाकी जोरात घसरली त्यावेळी कुशलने नियंत्रण मिळवायचा प्रयत्न केला. पण वेग खूप होता त्यामुळे दुचाकी जोरात घसरली. ' या अपघातामध्ये कुशलच्या डोक्याला आणि अंगाला गंभीर दुखापती झाल्या. त्याला जवळच्या रूग्णालयात तात्काळ दाखल कऱण्यात आले, पण तोपर्यंत वेळ गेला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पनवेल पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. त्याशिवाय इतर कोणत्याही वाहनाची धडक झाली नसल्याचे तपासात त्यांना समोर आले. भटक्या कुत्र्यापासून वाचण्याचा प्रयत्न करताना अचानक ब्रेक लावल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आलेय. पोलिसांनी २८१, १०६ (१) १२५(ब), कलम ३२४(४) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत धोकादायक वाहन चालवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उज्ज्वला थिटेंना धक्का, अनगरचा नगराध्यक्ष ठरला; जिल्हा न्यायालयानं नेमका निकाल काय दिला? VIDEO

India Tourism : काश्मीर-मनाली नाही; गुलाबी थंडीत आवर्जून फिरा 'हे' ठिकाण, जोडीदार होईल खुश

Blouse Fitting Tips: पहिल्यांदा ब्लाउज शिवायला देताय? मग परफेक्ट फिटींगसाठी लक्षात ठेवा या ट्रिक्स

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

भाजपप्रणित NDA ला मोठा हादरा; घटक पक्षातील प्रमुख नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

SCROLL FOR NEXT