Aditi Sunil Tatkare News Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra News: नावात अधिकृतरीत्या आईच्या नावाचा उल्लेख, मातृत्वाचा सन्मानासाठी ऐतिहासिक निर्णय: अदिती तटकरे

Aditi Sunil Tatkare: यंदाच्या जागतिक महिला दिनी (8 मार्च रोजी) जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या चौथ्या महिला धोरणात शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला.

साम टिव्ही ब्युरो

Aditi Sunil Tatkare News:

यंदाच्या जागतिक महिला दिनी (8 मार्च रोजी) जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या चौथ्या महिला धोरणात शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला. महायुती सरकारच्या माध्यमातून मातृत्वाचा सन्मान करणाऱ्या ऐतिहासिक निर्णयाची आज सुरुवात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याचबद्दल बोलताना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, ''आपल्या नावात अधिकृतरीत्या आईच्या नावाचा उल्लेख करत राज्यप्रमुखांनी या निर्णयाला अंमलात आणले. महिला व बाल विकास विभागाची जबाबदारी संभाळताना घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होताना पाहून अत्यंत आनंद होतोय.''  (Latest Marathi News)

त्या म्हणाल्या की, ''राज्यातील प्रत्येक महिलेचे कुटुंबातील अस्तित्व दाखवणारा हा निर्णय अत्यंत अभिमानास्पद आहे. याची दखल सर्वांनी घ्यावी आणि आपल्या मायमाऊलीला तिचा सन्मान मिळवून देत तिचे नावं आजपासून आपल्या संपूर्ण नावात लावण्यात यावे, याची अंमलबजावणी सर्व स्तरावर करण्यात यावी, असे आवाहन करते.''

जागतीक महिला दिनानीमीत्त भव्य हळदीकुंकू समारंभ

दरम्यान, जागतीक महिला दिनानीमीत्त अदिती तटकरे यांच्या उपस्थित शनिवारी सायंकाळी खालापूर तालुक्यातील ताकई येथे एस.पी. मैदानावर भव्य हळदीकुंकू समारंभ पार पडला. जागतीक महिला दिनानिमित्त आयोजीत या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील महिलावर्ग उपस्थित होता. सुधाकर घारे फाउंडेशन, खालापूर तालूका आणि खोपोली शहर राष्ट्रवादी महीला काँग्रेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि सुधाकर घारे उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suraj Chavan: लग्नाच्या तीन महिन्यातच सुरज चव्हाणच्या घरी हलणार पाळणा? संजनाच्या पोस्टमुळे रंगली चर्चा

Maharashtra Live News Update: नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात अवकाळी पाऊस; पिकांना फटका

महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपलं; शेतकरी हवालदिल, पुढील ४८ तासांत २४ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

4-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिनची ताकद, 4.1 सेकंदात 100 km/h वेग...; Audi SQ8 ची भारतात दमदार एंट्री, वाचा वैशिष्ट्ये

Breakfast Recipe : तांदूळ अन् उकडलेले बटाटे; १० मिनिटांत बनवा 'ही' कुरकुरीत रेसिपी, संध्याकाळी होईल पोटभर नाश्ता

SCROLL FOR NEXT