MNS MLA Raju Patil Viral Photo Saam tv
मुंबई/पुणे

Raju Patil Viral Photo: आमदार राजू पाटीलांचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल; मनसे कार्यकर्ते आक्रमक, काय आहे प्रकरण?

Kalyan News: आमदार राजू पाटीलांचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल; मनसे कार्यकर्ते आक्रमक, काय आहे प्रकरण?

Satish Kengar

>> अभिजित देशमुख

MNS MLA Raju Patil Viral Photo:

कल्याण डोंबिवलीत शिवसेना मनसे वाद विकोपाला पोहोचला आहे. सोशल मीडियावर शिवसेना मनसे नेत्यांमध्ये कधी ट्वीट तर कधी रिल्स वॉर सुरू झाली आहे.

गुरुवारी मनसेकडून एक व्हिडीओ तयार करुन व्हायरल केला गेला. त्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांचा एक आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्यात आला आहे. या प्रकरणात मनसे आक्रमक झाली आहे.

फोटो व्हायरल करनाऱ्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी ठाेस कारवाई केली नाही, तर मी याचा जाब विचारणार असल्याचे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

बदनामीकारक पोस्ट सोशल मिडियावर पसरविणाऱ्या विराेधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात केली आहे.

आमदार राजू पाटील यांची बदनामी करनाऱ्या विरोधात ठाेस कारवाई न केल्यास मनसे आपल्या पद्धतीने संबंधित व्यक्तीचा समाचार घेईल, असा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सर्जेराव पाटील यांनी आमच्याकडे तक्रार प्राप्त जाहल्याच सांगितलं आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaubeej 2026 Wishes : सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती! भाऊबीजेनिमित्त पाठवा हे मनाला भिडणारे शुभेच्छा संदेश; नात्यात वाढेल गोडवा

Maharashtra News Live Update: सतेज पाटलांची पत्रकार परिषद

Heart Health : हृदयविकाराच्या रुग्णांसाठी काजू-बादाम वरदान की शाप? तज्ज्ञांचा हा खुलासा वाचायलाच हवा

'मला धमकी देऊ नका,मीही पाटील आहे'; सतेज पाटलांचा चंद्रकांतदादांना सणसणीत टोला

Rohit Sharma Video: रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार; मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूच्या त्या 2 शब्दांनी शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT